Solapur District Central Bank takes possession of Mohite-Patil Trust's property for the dues of 40 crores | ४० कोटींच्या थकबाकीपोटी मोहिते-पाटील ट्रस्टच्या मालमत्तेवर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला ताबा

ठळक मुद्दे ३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपयांची थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावली होतीसंस्थेच्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला जमीन, इमारत, साहित्यांचा ताबा रिझर्व्ह बँक ११० कलमान्वये संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई करु शकते


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : ३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपये थकबाकीपोटी अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताबा नोटीस बजावली आहे. संस्थेच्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अकलूज-शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल ट्रस्टला कर्ज दिले होते. हे कर्ज या ट्रस्टने भरले नसल्याने बँकेने ३० एप्रिल १७ रोजी ३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपयांची थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावली होती. बँकेने दिलेल्या नोटीसमध्ये मुद्दल २७ कोटी व व्याज १२ कोटी अशी रक्कम ६० दिवसांत भरण्याबाबत मुदत दिली होती. या मुदतीत रक्कम भरणा केली नसल्याने सरफेशी कायदा २००२ नुसार या संस्थेने कर्जासाठी दिलेल्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे. आता प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र दिले जाणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
----------------
संस्थेच्या १६ पदाधिकाºयांना नोटिसा
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल चेअरमन, व्यवस्थापक व सचिव, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, रामचंद्र सावंत-पाटील, शंकरराव माने-देशमुख,सुभाष पताळे, मिलिंद कुलकर्णी,भीमराव काळे, दत्तात्रय शिर्के, रावसाहेब मगर, मोहनराव लोंढे, किसनराव वाघ, केशव ताटे, अर्जुन व्यवहारे, डॉ. मनोहर इनामदार, दिनकरराव खापे आदींना बँकेने नोटीस दिली आहे. 
------------------
जमीन, इमारत, साहित्यांचा ताबा 
यशवंतनगर येथील गट नंबर ९४ बिगरशेतीमधील ३८ हजार ५०० चौ.मीटर, गट नंबर ९३/२/२ बिगरशेतीमधील ३६ हजार ४०० चौ.मी. असे ७४ हजार ९०० चौ.मीटर क्षेत्र तसेच जमिनीवरील कॉलेज इमारत, प्राचार्य, प्राध्यापक निवासी इमारत, मुला-मुलींचे वसतिगृह असे ४ लाख चौ.फूट इमारत व त्यातील साहित्य आदींचा ताबा बँकेने घेतल्याची नोटीस बजावली आहे.
--------------------
रिझर्व्ह बँकेकडूनच कारवाईच्या सूचना आल्या आहेत. संचालक मंडळात मंजुरी देऊन कारवाई सुरू आहे. संचालक मंडळाने कारवाई केली नाही तर रिझर्व्ह बँक ११० कलमान्वये संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई करु शकते.
- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 


Web Title: Solapur District Central Bank takes possession of Mohite-Patil Trust's property for the dues of 40 crores
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.