सोलापूर जिल्हा बँकेच्या थकबाकीचा आलेख वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:06 PM2018-03-21T12:06:43+5:302018-03-21T12:06:43+5:30

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शेती व बिगरशेतीसाठी वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच आहे.

Solapur District Bank's outstanding balance sheet is growing | सोलापूर जिल्हा बँकेच्या थकबाकीचा आलेख वाढतोय

सोलापूर जिल्हा बँकेच्या थकबाकीचा आलेख वाढतोय

Next
ठळक मुद्देबिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली शेती कर्जाच्या थकबाकीत भरच पडत आहे

सोलापूर: जिल्हा बँकेची शेतीसाठीच्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच असून, जिल्हाभरातील १५ मार्चपर्यंत अवघी २० टक्के वसुली झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याची अवघी ६ टक्के वसुली झाल्याचे आकडेवारी सांगते.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शेती व बिगरशेतीसाठी वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच आहे. साखर कारखान्यांकडील थकबाकी येत नसल्याने बँकेने कारखान्यांचा ताबा घेणे व त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली जात असताना शेती कर्जाच्या थकबाकीत भरच पडत आहे.

या आर्थिक वर्षात १५ मार्च २०१८ पर्यंत जिल्ह्याची शेती कर्जाची वसुली अवघी २०.८९ टक्के इतकी आहे. मोहोळ तालुक्याची वसुली ३९.८० टक्के इतकी असून, जिल्ह्यात वसुलीत मोहोळ तालुका प्रथम क्रमांकावर आहे. माळशिरस तालुका ३४.५४ टक्के वसुली करुन जिल्ह्यात दुसºया क्रमांकावर आहे. उत्तर सोलापूर तालुक्याची वसुली ही २९ टक्के असून, हा तालुका तिसºया क्रमांकावर आहे. माढा तालुक्याची वसुली २४.२४ तर करमाळा तालुक्याची वसुली २१.७२ टक्के इतकी आहे. सांगोला तालुका वसुलीत सहाव्या क्रमांकावर असून, या तालुक्याची वसुलीची टक्केवारी २०.८२ इतकी आहे.

पंढरपूर तालुक्याची वसुली मागील वर्षीप्रमाणेच असून, २०.५८ टक्के इतकी आहे. बार्शी तालुका १६.८९ टक्के वसुली करुन आठव्या क्रमांकावर तर अक्कलकोट तालुका १५.२८ टक्के वसुली करुन नवव्या स्थानी आहे. मंगळवेढ्याची वसुली अवघी १२.४७ टक्के इतकी असून, दक्षिण सोलापूर तालुक्याची वसुली ६.१० टक्के इतकी आहे. 

दहा कारखान्यांची दिली वसुली
च्जिल्ह्यातील यावर्षी गाळप घेतलेल्या ३० पैकी अवघ्या १० साखर कारखान्यांनी शेतकºयांकडील शेती कर्जाच्या वसुलीसाठी सहकार्य केले आहे. गाळपासाठी आलेल्या उसातून जिल्हा बँकेचे कर्ज कपात करुन विठ्ठलराव शिंदे, सहकार महर्षी, पांडुरंग श्रीपूर, लोकनेते बाबुरावआण्णा पाटील, सिद्धनाथ शुगर, आदिनाथ करमाळा, मकाई करमाळा, कूर्मदास माढा व विठ्ठल शुगर म्हैसगाव या कारखान्यांनी बँकेला वसुली दिली तर इंद्रेश्वर बार्शी व फॅबटेक या कारखान्यांनी काहीअंशी सहकार्य केल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. 

कर्जमाफीच्या चर्चेने कर्जच भरेनात...

  • - २०११-१२ व १२-१३ या दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. 
  • - दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पन्नात घट झाल्याने बँकेची थकबाकी वाढल्याचे कारण सांगितले जात होते.
  • - मागील वर्षभरापासून कर्जमाफीच्या मागणीला जोर आल्याने संपूर्ण कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकºयांनी कर्ज भरले नाही.
  • - आता कर्जमाफी झाल्याने जिल्हा बँकेला ३३० कोटी रुपये आले असले तरी नव्याने कर्ज घेणारे थकबाकीत गेले आहेत.
  • - मागील वर्षी याच कालावधीची वसुली १८.९० टक्के होती. यावर्षी कर्जमाफीची ३३० कोटी इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होऊनही वसुलीची टक्केवारी २०.८९ इतकी आहे.

 

Web Title: Solapur District Bank's outstanding balance sheet is growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.