सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची शेवटची ‘यलो’ यादी बँकेला मिळाली, ५७ हजार १५१ शेतकºयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:13 PM2018-01-17T14:13:30+5:302018-01-17T14:14:38+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.

In the Solapur district, the bank received the last 'Yellow' list of debt waiver, including 57 thousand 151 farmers. | सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची शेवटची ‘यलो’ यादी बँकेला मिळाली, ५७ हजार १५१ शेतकºयांचा समावेश

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची शेवटची ‘यलो’ यादी बँकेला मिळाली, ५७ हजार १५१ शेतकºयांचा समावेश

Next
ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे.त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार


लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर दि १७ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे. यापूर्वी जिल्हा बँकेला एकूण ९५ हजार १७९ शेतकºयांची यादी आली असून त्यांच्यासाठी ३५९ कोटी ३४ हजार १२७ रुपयांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात बँकेला २७५ कोटी ६६ लाख चार हजार ५०१ रुपये देण्यात आले होते. आलेल्या यादीची तपासणी केली असता ६६ हजार ८०९ शेतकºयांची कर्जखात्याची माहिती बरोबर आढळली. तपासणीत २८ हजार ३७० शेतकºयांच्या खात्याबाबत चुका निघाल्या होत्या. त्या चुका दुरुस्त करून बरोबर असलेली शेतकºयांची याद शासनाकडे पाठवली आहे. या यादीबाबत शासनाने अद्याप काहीही निर्णय घेतला नाही. बँकेने आतापर्यंत ५१ हजार १८१ शेतकºयांच्या खात्यावर २६५ कोटी ७ लाख ८१ हजार २९० रुपये जमा केले आहेत. दीड लाखावरील कर्जदारांची संख्या २५ हजार ४६१ इतकी असून या शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केली तरच त्यांना दीड लाखाची रक्कम मिळणार आहे.
नव्याने १० हजार १४० शेतकºयांची त्रुटी असलेली यादी तर ४७ हजार ११ शेतकºयांच्या यादीत मेळ (मिसमॅच) नसलेली यादी जिल्हा बँकेला मिळाली आहे. ही यादी अंतिम असून तिला शासनाने ‘यलो’(पिवळी) संभोधले आहे. यादीतील शेतकºयांच्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करून परत शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले. 
----------------------------
आठ कोटी दिले परत
- जिल्हा बँक व आॅनलाईन भरलेल्या फॉर्ममधील माहितीत मेळ नसलेल्या (मिसमॅच)च्या ४७ हजार ११ शेतकºयांच्या याद्या बँकेच्या शाखेत लावण्यात येतील.
- त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे.
- तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार आहे.
- कर्जमाफीसाठी दिलेल्यांपैकी ८ कोटी रुपये शासनाला परत दिले असून बँकेकडे दोन कोटी ५८ लाख २३ हजार २११ रुपये शिल्लक आहेत.

Web Title: In the Solapur district, the bank received the last 'Yellow' list of debt waiver, including 57 thousand 151 farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.