ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ११ -  सोलापूर-विजापूर महामार्गावरील हत्तुरगावाजवळ कार झाडावर आढळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार  झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे झाला. 
 
विरेंद्र लक्ष्मण तलवार (वय ३०.रा.श्रीपाद अपार्टमेंट उरण नवी मुंबई), नितिन शंकर बिराजदार (वय २७.रा.धुळखेड.ता इंडी.ता.विजापूर), तेजस अशोक  वाडदेकर (वय २७. सिधु विहार विजापूर रोड सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर  मिलींद दत्तात्रय वाघमारे (रा.सिधु विहार विजापूर रोड सोलापूर), आकाश सुर्यंकात गायकवाड (श्रीपाद अपार्टमेंट उरण नवी मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूरातून विजापूरकडे कार (एमएच ०२ सीडी ९४९६) मधून पाचजण निघाले होते. हत्तूरजव एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रणसुटले आणि कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यत दोन तीन वेळा उलटली व झाडावर जाउन आदळली. या भीषण अपघातात तीघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 
विजापूर नाका पोलीसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.