सोलापूर बाजार समिती, चार वर्षांनंतर कांद्याची सव्वानऊ कोटी उलाढाल निर्यातमूल्य लावल्याने कांदा दराला फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:38 AM2017-11-28T11:38:59+5:302017-11-28T11:40:36+5:30

केंद्र शासनाने कांद्यावर प्रतिटन ८५० डॉलर प्रतिटन इतके किमान निर्यातमूल्य लावल्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याच्या दरात घसरण झाली. ५ हजार २०० रुपयांवर गेलेला दर सोमवारी ४८०० वर खाली आला. 

Solapur Bazar committee, after four years, made onion worth Rs. | सोलापूर बाजार समिती, चार वर्षांनंतर कांद्याची सव्वानऊ कोटी उलाढाल निर्यातमूल्य लावल्याने कांदा दराला फटका !

सोलापूर बाजार समिती, चार वर्षांनंतर कांद्याची सव्वानऊ कोटी उलाढाल निर्यातमूल्य लावल्याने कांदा दराला फटका !

Next
ठळक मुद्देसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याची उलाढाल राज्यात आघाडीवर ५ हजार २०० रुपयांवर गेलेला दर ४८०० वर खाली आलानिर्यातमूल्य वाढविल्याने दरात घसरण व्यापाºयांना कांदा निर्यातीसाठीचा खर्च वाढणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : केंद्र शासनाने कांद्यावर प्रतिटन ८५० डॉलर प्रतिटन इतके किमान निर्यातमूल्य लावल्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याच्या दरात घसरण झाली. ५ हजार २०० रुपयांवर गेलेला दर सोमवारी ४८०० वर खाली आला. 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याची उलाढाल राज्यात आघाडीवर असते. सोलापूर बाजार समितीमधून कर्नाटक, आंध्रप्रदेश व दक्षिण भारतातील राज्यात कांदा जातो. यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. यावर्षी कांद्याची आवक वरचेवर वाढू लागली आहे. 
कांद्याची आवक जसजशी वाढेल तसतशी दरातही घसरण होणार परंतु निर्यातमूल्य वाढविल्याने दरात घसरण होत असल्याचे खरेदीदार व्यापाºयांकडून सांगण्यात आले. देशभरात कांद्याचे उत्पादन कमी होणार असल्याचा प्राथमिक अंदाज असतानाच कांदा निर्यातीवरचे मूल्य वाढविण्यात आले आहे. यामुळे व्यापाºयांना कांदा निर्यातीसाठीचा खर्च वाढणार असल्याने कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे कारण व्यापाºयांनी सांगितले.
------------------------
चार वर्षांनंतर दरात वाढ 
- सोलापूर बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात ५ हजार २०० रुपयांवर गेलेला दर सोमवारी ४८०० वर खाली आला. 
- सोमवारी बाजार समितीमध्ये ४०५ ट्रक (४०, ५३० क्विंटल) कांदा विक्रीतून ९ कोटी ३२ लाख १९ हजारांची उलाढाल
- सरासरी २३०० रुपयांचा दर कांद्याला आला
- नोव्हेंबर २०१३ मध्ये एकाच दिवशी १० कोटी ५७ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
- डिसेंबर २०१३ मध्ये एकाच दिवशी ६७१ ट्रक कांद्याच्या विक्रीतून १० कोटी ८८ लाखांची उलाढाल झाली होती. 
-----------------
डाळिंबाच्या 
दरात वाढ
- सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या डाळिंबाला ५५ रुपयाचा दर मिळत होता. सोमवारी डाळिंबाची आवक वाढून १५ हजार कॅरेट इतकी झाली असताना दरही ७० रुपये इतका आला.  दरात वाढ झाल्याने शेतकºयांच्या हातात अधिक चार पैसे पडणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात डाळिांबचे क्षेत्र वाढल्याने उत्पादनही वाढले आहे. 
----------------
जिल्ह्यात 
कांद्याचे क्षेत्र घटले
- मागील दोन वर्षे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. अगोदरच पाणी कमी असताना मोठ्या कष्टाने आणलेला कांदा मातीमोल भावाने विकावा लागला होता. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी होती. यामुळे यावर्षी कांद्याची लागवडच कमी झाली आहे. यावर्षी कांदा उत्पादक व उत्पादन कमी असले तरी त्यांना अधिक पैसे मिळू लागले आहेत. 
-----------------
चार वर्षांनंतर कांद्याची उलाढाल वाढली आहे. २०१३ नंतर कांद्याची आवक वाढली असेल परंतु दरात वाढ झाल्याने सोमवारी मोठी उलाढाल झाली. यावर्षीच्या हंगामात कांद्याची सर्वाधिक उलाढाल. 
- विनोद पाटील
प्र. सचिव, सोलापूर बाजार समिती़ 

Web Title: Solapur Bazar committee, after four years, made onion worth Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.