सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस सोबत, मोहोळमध्ये सर्वत्र लढाई; धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:45 PM2019-01-18T12:45:45+5:302019-01-18T12:47:59+5:30

कुरुल : केंद्र सरकारने ५० लाख टन साखरेची निर्यात तातडीने केली तर देशांतर्गत साखरेला मागणी वाढून चांगला दर मिळेल. ...

Solapur, along with Congress for the Lok Sabha election, fought everywhere in Mohol; Dhananjay Mahadik | सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस सोबत, मोहोळमध्ये सर्वत्र लढाई; धनंजय महाडिक

सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस सोबत, मोहोळमध्ये सर्वत्र लढाई; धनंजय महाडिक

googlenewsNext
ठळक मुद्देटाकळी सिकंदर येथे संसदरत्न पुरस्कार मिळाल्याने सत्कारभीमा-लोकशक्ती परिवार ताकदीने उतरून आमचा उमेदवार निवडून आणू - धनंजय महाडिकआगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून माझी उमेदवारी निश्चित - धनंजय महाडिक

कुरुल : केंद्र सरकारने ५० लाख टन साखरेची निर्यात तातडीने केली तर देशांतर्गत साखरेला मागणी वाढून चांगला दर मिळेल. साखर विक्री मूल्य २,९०० रुपयांवरून बत्तीसशे रुपयांपर्यंत केले तरच बँका आवश्यक तेवढे कर्ज देतील व त्यानंतर एफआरपीप्रमाणे दर देणे कारखान्यांना शक्य होईल. सोलापूरलोकसभा निवडणुकीत युती झाल्याने काँग्रेस सोबतच असणार असून, मोहोळमध्ये भीमा व लोकशक्ती परिवार स्वतंत्र लढाई लढणार असल्याचे मत भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

खासदार महाडिक यांना सलग तिसºयांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सभासद व शेतकºयांतर्फे सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, वाहतूक संघाचे अध्यक्ष श्रीधर बिरजे, कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते. 

आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून माझी उमेदवारी निश्चित आहे. पक्षांतर्गत काही कुरबुरी, समज-गैरसमज होते. ते पक्षाध्यक्ष शरद पवारांनी दूर केले आहेत. त्यामुळे सर्व जण कामाला लागले आहेत. येणाºया लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असल्याने सोलापूर मतदारसंघात आम्ही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाच प्रचार करणार असल्याचे सांगितले. लोकशक्ती परिवाराचे नेते विजयराज डोंगरे भाजपच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आणून देताच मला त्यांची नवी भूमिका माहीत नाही. मात्र कामासाठी संपर्कात असणे व प्रवेश करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोकसभेला आम्हाला प्रचारासाठी बोलावले तर स्थानिक पातळीवरचे राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या स्टेजवर जावे लागेल, असे यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. 

ताकदीने उमेदवार निवडणून आणूच
- विधानसभा निवडणुकीत मात्र मोहोळ मतदारसंघात भीमा-लोकशक्ती परिवार ताकदीने उतरून आमचा उमेदवार निवडून आणू, असेही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू आहे. कार्यर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Solapur, along with Congress for the Lok Sabha election, fought everywhere in Mohol; Dhananjay Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.