सोलापुरात सहाव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वी, यकृताचे पुण्याला, डोळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयास दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:30 PM2018-02-14T12:30:29+5:302018-02-14T12:33:07+5:30

अवयवदान प्रक्रियेत पुणे, मुंबई, औरंगाबादनंतर जाणीव जागृतीमध्ये अग्रेसर ठरलेल्या सोलापूर शहरात सहाव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम पार पडली.

Sixth Green Corridor campaign successful in Solapur, donated to Pune hospital, Solapur hospital | सोलापुरात सहाव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वी, यकृताचे पुण्याला, डोळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयास दान

सोलापुरात सहाव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वी, यकृताचे पुण्याला, डोळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयास दान

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूरच्या यशोधरा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे यकृत शस्त्रक्रियेद्वारे काढून ते पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयातील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश प्रकाश काशिनाथ भागवत (वय ५४, रा. शहापूर, जि. ठाणे) असे अवयवदान केलेल्या रुग्णाचे नाव आहेदान केलेले हे यकृत तीन तासात पुण्याच्या रुग्णालयात पोहोचवण्यात यश


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १४ : अवयवदान प्रक्रियेत पुणे, मुंबई, औरंगाबादनंतर जाणीव जागृतीमध्ये अग्रेसर ठरलेल्या सोलापूर शहरात सहाव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम पार पडली. सोलापूरच्या यशोधरा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे यकृत शस्त्रक्रियेद्वारे काढून ते पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयातील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश आले. शिवाय डोळे सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील रुग्णासाठी सुपूर्द करण्यात आले. प्रकाश काशिनाथ भागवत (वय ५४, रा. शहापूर, जि. ठाणे) असे अवयवदान केलेल्या रुग्णाचे नाव आहे. 
सोलापुरात आय. आर. बी. कंपनीत नोकरीस असलेल्या प्रकाश भागवत यांना मेंदूच्या विकारामुळे झटके येत असल्याने यशोधरा हॉस्पिटलमध्ये रविवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूच्या निम्म्या भागास रक्तपुरवठा होत असल्याने डॉ. आशिष भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी ६ वाजता त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांचे ब्रेनडेड झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधित रुग्णाचे साडू मुंबईच्या जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी असल्यामुळे त्यांना अवयवदानाबद्दल कल्पना होती. त्यांनी रुग्णाच्या नातलगांना अवयवदानासाठी प्रवृत्त केले.
यानंतर पुण्याच्या प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीशी संपर्क साधून रुग्णाचे नातेवाईक अवयवदानास तयार असल्याचे कळवण्यात आले. त्यांचे यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणास योग्य असल्याने पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील एका गरजू रुग्णास हे यकृत बसवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पुढील हालचाली झाल्या. आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. जुनैद, डॉ. आशिष अंधारे, विनायक कदम हे डॉक्टरांचे पथक सोलापुरात आले. मंगळवारी सकाळी यशोधरा रुग्णालयात ब्रेनडेड रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्यांचे यकृत काढले. दुपारी १२ वाजता ते पुण्याकडे रवाना झाले. ही प्रक्रिया रुग्णालयाचे चेअरमन डॉ. बसवराज कोलूर, डॉ. विजय शिवपूजे, डॉ. हेमंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 
-----------------------
यकृत तीन तासांत पुण्याला रवाना
च्यशोधरा रुग्णालय सोलापूर ते आदित्य बिर्ला रुग्णालय पुणे हा तीन तास ग्रीन कॉरिडॉर करण्यात येऊन दान केलेले हे यकृत तीन तासात पुण्याच्या रुग्णालयात पोहोचवण्यात यश आले. अवयवदान प्रक्रियेच्या तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याकामी रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी विजयचंद्रा त्यांचे सहकारी परेश मणलोर, सुकांत बेळे, धनंजय मुळे, दत्ता होसमनी आणि संपत हलकट्टी यांनी मोलाची भूमिका पार पाडली. अवयवदान करणाºया रुग्णांची स्थिती चांगली राखून अवयवदान यशस्वी करण्यास अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. शहेरोज बॉम्बेवाले, भूलतज्ज्ञ डॉ. राहुल स्वामी आणि शस्त्रक्रिया विभागातील अन्य कर्मचाºयांनी सहकार्य केले. 
-------------------------
च्सोलापुरात यापूर्वी अश्विनी सहकारी रुग्णालय, अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी येथून उस्मानाबादच्या शिवशंकर कोळी यांच्यासह अन्य दोघे, शासकीय रुग्णालयात बसवकल्याण येथील ओंकार अशोक महिंदरकर, यशोधरा हॉस्पिटलमध्ये सविता डिकरे, कालिका महामुनी, चंद्रकांत घोळसगावकर आणि आता प्रकाश भागवत अशी अवयवदान केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना अवयवदान प्रत्यारोपण करण्यात आले आहे. सोलापुरात अशी मोहीम सहाव्यांदा पार पडली. मंगळवारी ब्रेनडेड झाल्याने अवयवदान झालेल्या प्रकाश भागवत यांच्या यकृताशिवाय डोळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी दान करण्यात आले. 

Web Title: Sixth Green Corridor campaign successful in Solapur, donated to Pune hospital, Solapur hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.