महिला दिनी राष्ट्रवादी महिला आघाडीचे सोलापूरात मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:28 PM2018-03-08T13:28:31+5:302018-03-08T13:28:31+5:30

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याऐवजी जाहिरातबाजीत दंग आहे.

Silent movement of the women's day Nationalist Women's Front in Solapur | महिला दिनी राष्ट्रवादी महिला आघाडीचे सोलापूरात मूक आंदोलन

महिला दिनी राष्ट्रवादी महिला आघाडीचे सोलापूरात मूक आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देआज एखादी महिला रस्त्यावरून जाताना सुरक्षित घरी जाईल याबाबत शंखाराष्ट्रवादीच्या अन्य महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित

सोलापूर :  भाजप सरकार महिलांची सुरक्षा ठेवण्यात अपयशी ठरल्याचा निषेधार्थ सोलापूर शहर - जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने गुरुवारी चार हुतात्मा पुतळा येथे मूक आंदोलन करण्यात आले. जिल्हा निरीक्षक निर्मला बाविकर, शहराध्यक्षा नगरसेविका सुनीता रोटे आणि ग्रामीणच्या अध्यक्षा मंदाताई काळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

      महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याऐवजी जाहिरातबाजीत दंग आहे. आज एखादी महिला रस्त्यावरून जाताना सुरक्षित घरी जाईल याबाबत शंखा निर्माण झाल्याचे निरीक्षक निर्मला बाविकर यांनी सांगितले.

       यावेळी मंगलाताई कोल्हे, लता ढेरे, बार्शी अध्यक्ष उषा गरड,  मंगल शेळवने, करुणा हिंगमीरे, उल्का गायकवाड, शामल काशीद, गोकर्णा डीसले, संगम्म। सगरे,  उज्वला पाटील, अंजली मोरे, लक्ष्मी पवार, शशिकला भरते, रेश्मा यादव, अनिता पवार, रंजना हजारे, प्रतिभा गायकवाड, संपता निचळ, यशोदा कांबळे, सिंधू वाघमारे, कल्पना खंदारे, सुनीता धोत्रे, सुरेखा पाटील, लक्ष्मी भोसले, नागरबाई चवरे, नैना तोडकरी, संगीता चाफाकारंडे, रुक्मिणी गायकवाड, कल्पना मसळे, विजया सावंत, हिरबाई शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Silent movement of the women's day Nationalist Women's Front in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.