सिद्धेश्वर यात्रा :   कानठळ्या बसविणारे औटगोळे यंदाच्या दारूकामातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:01 PM2018-12-17T12:01:14+5:302018-12-17T12:03:33+5:30

१२५ डेसिबलपेक्षा कमी आवाजाची मर्यादा, पोलिसांची राहणार नजर

Siddheshvar Yatra: Outlaws imposing ban on this time of liquor | सिद्धेश्वर यात्रा :   कानठळ्या बसविणारे औटगोळे यंदाच्या दारूकामातून हद्दपार

सिद्धेश्वर यात्रा :   कानठळ्या बसविणारे औटगोळे यंदाच्या दारूकामातून हद्दपार

Next
ठळक मुद्देयंदा शोभेच्या दारुकामास फाटा देऊन ‘लेसर शो’ दाखविण्याचा प्रस्ताव तूर्त बारगळला.ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील चार प्रमुख सोहळे १२५ डेसिबलपेक्षा कमी क्षमतेचे प्रकार यात्रा सोहळ्यात सादर होऊ शकतात

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : दिवाळीच्या आधी फटाके उडविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर यंदा शोभेच्या दारुकामास फाटा देऊन ‘लेसर शो’ दाखविण्याचा प्रस्ताव तूर्त बारगळला. त्यामुळे १२५ डेसिबलपेक्षा (ध्वनी क्षमता) कमी आवाजाचे प्रकार सादर करुन यंदा शोभेच्या दारुकामाचे शेवटचेच दर्शन भक्तगणांना घडणार आहे. यंदाच्या दारुकामावेळी उंच-उंच आकाशात उडणाºया औटगोळ्यांचा आवाज मात्र सोहळ्याची रंगत कमी करणारा ठरणार आहे.

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील चार प्रमुख सोहळे. तैलाभिषेक, अक्षता, होम प्रदीपन आणि शोभेचे दारुकाम या चारही सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती असते. यातील शोभेचे दारुकाम म्हणजे बालगोपाळांचे खास आकर्षण असते. एका अर्थाने या सोहळ्याने यात्रेची सांगताच असते. सोलापूर शहर, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधील फटाके कारखानदार शोभेचे दारुकाम करीत श्री सिद्धेश्वर चरणी आपली सेवा रुजू करीत असतात. यात्रेच्या १५ दिवस आधी शोभेचे दारुकाम सादर करणाºया फटाके कारखानदारांकडून अर्ज मागवले जातात. त्यानंतर निवड झालेल्यांकडून प्र्रकारांची यादी मागवली जाते. 

परंपरा असलेल्या यात्रेत २०१७ पर्यंत शोभेचे दारुकाम सोहळा रंगायचा अन् सजायचा. मात्र यंदा सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या सोहळ्यावर थोडेफार सावट आले. यंदा दारुकाम सोहळा होतो की नाही .? असाच प्रश्न श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीसमोर पडला. शोभेच्या दारुकामऐवजी ‘लेसर शो’चा प्रस्ताव आला. त्याबाबत हैदराबाद आणि अन्य ठिकाणी असलेल्या कंपन्यांची चौकशीही झाली. परंतु या शोबाबत ठोस काही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी हा प्रस्ताव बाजूला पडला आणि सर्वाेच्च न्यायालयाच्या अधीन राहून आणि त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसारच शोभेचे दारुकाम सोहळा पार पाडण्याची दाट शक्यता आहे. 

कमी क्षमतेचे प्रकार सादर होऊ शकतात...
- १२५ डेसिबलपेक्षा कमी क्षमतेचे औटगोळे कितपत शोभेच्या दारुकाम सोहळ्याची रंगत वाढवितात हा खरा प्रश्न आहे. जर कमी क्षमतेचे औटगोळे उडवले गेले तर मोकळ्या मैदानात त्याचा आवाज १२५ डेसिबलपेक्षा अधिक घुमतो. त्यामुळे सोहळ्यात सहभागी फटाके कारखानदारांवर कारवाई होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे यंदा शोभेच्या दारुकाम सोहळ्यात त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. १२५ डेसिबलपेक्षा कमी क्षमतेचे प्रकार यात्रा सोहळ्यात सादर होऊ शकतात, नव्हे तर सोहळ्याची रंगतही वाढवू शकतात, असे एम. ए. पटेल फायर वर्क्सचे ख्वाजादाऊद पटेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

यंदा लेसर शो दाखवण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. शोभेचे दारुकाम होणार असेल तर १२५ डेसिबलपेक्षा कमी क्षमतेचे प्रकार पंचकमिटीला जेणेकरुन फटाके कारखानदारांना सादर करावे लागेल. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची पोलीस खात्याची जबाबदारीच आहे.
- नरसिंह अंकुशकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक- सदर बझार पोलीस ठाणे.

Web Title: Siddheshvar Yatra: Outlaws imposing ban on this time of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.