ठळक मुद्देअमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील १५० वॉल्व्ह व १0 एक्सपायशेन वॉल्व्ह बदलण्याचे काम मंजूर शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार वॉल्व्ह बदलण्याच्या कामासाठी पाच पथके तयारआजपासून नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ :  अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील वॉल्व्ह बदलण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार व पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 
दीर्घकालीन पाणीपुरवठा सुधारणा करण्यासाठी अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील १५० वॉल्व्ह व १0 एक्सपायशेन वॉल्व्ह बदलण्याचे काम मंजूर झाले आहे. यातून १३७ वॉल्व्ह व ७ एक्सपायशेन वॉल्व्ह बदलण्याचे नियोजन आहे. २५ आॅक्टोबर रोजी या जलवाहिनीवरील वॉल्व्ह बदलण्यासाठी शटडाऊन घेण्यात आले होते. यात १३ वॉल्व्ह व एक एक्सपायशेन वॉल्व्ह बदलण्याचे काम झाले. त्यामुळे शहर व हद्दवाढ विभागाला दहा दिवस चार दिवसाआड पाणीपुरवठा झाला. आता दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे २0 नोव्हेंबरपर्यंत शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. वॉल्व्ह बदलण्याच्या कामासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पण बुधवारी वीज कंपनीने शटडाऊन घेतल्यास मात्र पाणीपुरवठ्यास विलंब होणार आहे. त्यामुळे आजपासून नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.
---------------------------
असे होईल नियोजन
१३ नोव्हेंबर रोजी सेटलमेंट, रामवाडी, भूषणनगर, धोंडिबावस्ती या भागाला शक्य झाल्यास १५ नोव्हेंबर रोजी रात्री किंवा १६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाणी मिळेल. बाळे, सलगरवस्ती, देगाव, मरिआई चौक, अवंतीनगर परिसर, उत्तर कसबा, मुरारजीपेठ परिसर, इंदिरानगर, रामलिंग सोसायटी, भूषणनगर, गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १ व २, यतिमखाना, शहानगर, ईरण्णावस्ती, आदित्यनगर, माशाळवस्ती, राजस्वनगर,गणेशनगर, नालंदानगर, शेटेवस्ती, गवळीवस्ती, आंबेडकरनगर, विद्यानगरी, साईधननगर या परिसराला पाच दिवसाआड तर उर्वरित शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.