कर वसुलीसाठी गेलेल्या सोलापूर महापालिकेच्या कर्मचाºयांवर दुकानदारांनी केली अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 02:00 PM2019-03-14T14:00:15+5:302019-03-14T14:01:33+5:30

सोलापूर : महापालिकेचा मिळकत कर वसूल करण्यास गेलेल्या महिला कर्मचारी तेजस्विता क्षीरसागर यांच्यासह इतर कर्मचाºयांवर बाजार समितीतील दुकानदारांनी अरेरावी ...

Shoppers have made the employees of Solapur Municipal Corporation gone for tax recovery | कर वसुलीसाठी गेलेल्या सोलापूर महापालिकेच्या कर्मचाºयांवर दुकानदारांनी केली अरेरावी

कर वसुलीसाठी गेलेल्या सोलापूर महापालिकेच्या कर्मचाºयांवर दुकानदारांनी केली अरेरावी

Next
ठळक मुद्देबाजार समितीच्या आवारात मिळकतकर वसुलीची मोहीम पुढील आठवडाभर कायम राहणारजे मिळकतदार थकबाकी भरायला नकार देतील त्यांच्या मिळकती सील करण्यात येणार मनपा कर्मचाºयांनी ५० हजार रुपयांवरील थकबाकीप्रकरणी मिळकती सील करण्यास सुरुवात

सोलापूर : महापालिकेचा मिळकतकर वसूल करण्यास गेलेल्या महिला कर्मचारी तेजस्विता क्षीरसागर यांच्यासह इतर कर्मचाºयांवर बाजार समितीतील दुकानदारांनी अरेरावी केली.

महापालिकेने मिळकतकर वसुलीची मोहीम सुरू केली आहे. मनपा कर्मचाºयांनी ५० हजार रुपयांवरील थकबाकीप्रकरणी मिळकती सील करण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीच्या आवारातील इम्रान ट्रेडर्स, महाराष्ट्र फ्लावर, एस.एम. कल्याणी या दुकानांना सील केले. यातील कासार ट्रेडर्स, महाराष्टÑ फ्लावर यांनी थकबाकीची रक्कम भरल्याने सील काढण्यात आले.

यादरम्यान कल्याणी यांच्या दुकानातील वसुलीप्रसंगी काही व्यापाºयांनी मनपा कर्मचाºयांशी हुज्जत घातली. आले आले़़़ मोदीचे लोक आले़़़, असे एक व्यापारी म्हणाला. त्यावर तेजस्विता क्षीरसागर म्हणाल्या, राजकारण करु नका, आम्ही कर वसुलीसाठी आलो आहोत़ त्यावर व्यापाºयाने, आम्ही लोकशाहीत राहतो, कुणाला घाबरत नाही, तुम्हाला महापालिकेत येऊन बघतो, मागे तुमच्या एका अधिकाºयाला सरळ केले होते, असा वाद घातला. वाद वाढत चाललेला असताना दोघांनीही मोबाईलद्वारे या वादाचे शुटिंग करण्याचा प्रयत्न केला. इतर कर्मचाºयांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. 

बाजार समितीच्या आवारात मिळकतकर वसुलीची मोहीम पुढील आठवडाभर कायम राहणार आहे. जे मिळकतदार थकबाकी भरायला नकार देतील त्यांच्या मिळकती सील करण्यात येणार असल्याचा इशारा कर संकलन अधिकारी पी.व्ही. थडसरे यांनी दिला. 

आयुक्तांची भेट घेणार
च्मिळकतकर वसुली मोहिमेत अनेक नागरिक सहकार्य करीत आहेत. पण काही व्यापारी लोकांकडून अधिकाºयांना, कर्मचाºयांना अरेरावी केली जात आहे. यावर चर्चा करण्यासाठी मिळकतकर वसुली करणारे कर्मचारी गुरुवारी महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची भेट घेणार आहेत. मागील वर्षी भाजपाच्या नगरसेविकेने वाद घातला होता. 

Web Title: Shoppers have made the employees of Solapur Municipal Corporation gone for tax recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.