सर्व्हर बंद असल्यामुळे आवास योजनेतील ६२ हजार नोंदणी थांबल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:57 AM2018-10-05T10:57:21+5:302018-10-05T10:59:25+5:30

आवास योजना: आठवड्यात समस्या सुटणार

Since the server is closed, the housing scheme of 62 thousand stops | सर्व्हर बंद असल्यामुळे आवास योजनेतील ६२ हजार नोंदणी थांबल्या 

सर्व्हर बंद असल्यामुळे आवास योजनेतील ६२ हजार नोंदणी थांबल्या 

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आॅनलाईन सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आलेसन २0१८—१९ मध्ये १८४५ घरकुलांना मंजुरी दिलीजिल्ह्याला तीन वर्षांत १५ हजार ७७५ घरकुलांचे उद्दिष्ट दिले

सोलापूर : शासनाचे सर्व्हर बंद पडल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील ६२ हजार अर्जांची नोंदणी प्रलंबित राहिली आहे. येत्या आठवड्यात सर्व्हर सुरू झाल्यानंतर हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. 

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सोलापूर जिल्ह्याला तीन वर्षांत १५ हजार ७७५ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. याप्रमाणे आत्तापर्यंत १0 हजार ९५४ घरे पूर्ण झाली असून, उर्वरित घरांचे बांधकाम मार्चअखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. सन २0१६-१७ मध्ये ९ हजार ४५४ घरे मंजूर करण्यात आली, त्यातील ९३२८ घरे पूर्ण झाली आहेत. ३५३ जणांनी घरकुलाचे बांधकाम न केल्याने त्यांच्याकडून वितरित केलेल्या अनुदानाचे पैसे वसूल करण्यात आले आहेत. सन २0१७—१८ मध्ये ४४८९ घरकुलांना मंजुरी दिली त्यातील २३८१ घरकुले पूर्ण झाली आहेत उर्वरित घरकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सन २0१८—१९ मध्ये १८४५ घरकुलांना मंजुरी दिली असून, त्यातील २१४ घरे पूर्ण झाली आहेत. 

जिल्ह्यात आॅनलाईन सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. उद्दिष्ट २ लाख ५ हजार कुटुंबाचे होते. १ लाख ३८ हजार अर्ज आॅनलाईन नोंदणी करण्यात आले आहेत. पण नंतर सर्व्हर बंद राहिल्यामुळे हे काम थांबले आहे. अद्याप ६२ हजार अर्जांची नोंदणी व्हायची आहे. सध्या ७0 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर अखेर मुदत आहे. आठवडाभरात सर्व्हर सुरू झाल्यावर हे काम पूर्ण करण्यात येईल असे डॉ. भारुड यांनी स्पष्ट केले. 

५७ जण बिनपगारी
च्दिल्ली येथे होणाºया कार्यक्रमासाठी हजर राहण्यासाठी झेडपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड गेल्यावर येथील कामकाजात शिथिलता आली होती. अनेक कर्मचारी हजेरी पुस्तकावर सह्या करून गायब झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी डॉ. भारुड कार्यालयात आल्याबरोबर कर्मचाºयांची हजेरी घेतली. लेटकमर येणाºया ५७ कर्मचाºयांना बिनपगारी करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

Web Title: Since the server is closed, the housing scheme of 62 thousand stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.