विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर नव्या सहा सदस्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 04:34 AM2018-04-06T04:34:36+5:302018-04-06T04:34:36+5:30

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर मंदिर समितीत नव्याने सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

 Selection of six new members on Vitthal-Rukmini temple committee | विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर नव्या सहा सदस्यांची निवड

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर नव्या सहा सदस्यांची निवड

Next

मुंबई/ पंढरपूर (जि. सोलापूर) -  अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर मंदिर समितीत नव्याने सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
२ जुलै रोजी अध्यक्षांसह ९ सदस्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले, तर सदस्य म्हणून आ़ राम कदम, शकुंतला नडगिरे, दिनेशकुमार कदम, सचिन अधटराव, ह़ भ़ प़ भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, ह़ भ़ प़ गहिनीनाथ महाराज औसेकर, संभाजी शिंदे, पदसिद्ध नगराध्यक्ष साधना भोसले यांची निवड करण्यात आली होती.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामकाजासाठी राज्य शासनाने स्वतंत्र कायदा केला आहे. या कायद्यानुसार समितीच्या सदस्यांची एकूण संख्या १२ वरून १५ इतकी वाढविण्यासाठी आणि सदस्यांची संख्या ९ वरून १४ इतकी करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.
त्यामुळे नव्याने मंदिर समितीच्या सदस्यपदी ह़ भ़ प़ ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माधवी निगडे, अतुल भगरेशास्त्री, शिवाजीराव मोरे, ह़ भ़ प़ प्रकाश महाराज जवंजाळ, आ. सुजितसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.
सहअध्यक्षपदी वारकरी प्रतिनिधी असावा, अशी मागणी वारकऱ्यांमधून होत होती. यामुळेच ह़ भ़ प़ गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड करण्यात आली
आहे़

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामकाजासाठी वरिष्ठ वारकºयांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी वारकºयांचा समावेश असलेल्या एका मार्गदर्शक समितीची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. त्यामळे मंदिर समितीचा कारभार अधिक लोकाभिमुख व रूढी, परंपरेनुसार होण्यास मदत होणार आहे.
- चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री

सहअध्यक्ष - गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर
विधान परिषद सदस्य - सुजितसिंंह मानसिंह ठाकूर
सदस्य - ह.भ.प. ज्ञानेश्वर नामदेव देशमुख (जळगांवकर)
सदस्य - अ‍ॅड. माधवी श्रीरंग निगडे
सदस्य - प्रकाश रुस्तुमराव जवंजाळ
सदस्य - भागवतभूषण अतुलशास्त्री अशोकराव भगरे
सदस्य - ह.भ.प. शिवाजीराव मोरे

Web Title:  Selection of six new members on Vitthal-Rukmini temple committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.