नव्या नियमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुका घ्या़....सहकार खात्याचे आदेश, याद्या तयार करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:54 AM2017-12-20T11:54:26+5:302017-12-20T11:56:08+5:30

नव्या कायद्यानुसार होणाºया बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी असतील तसेच निवडणुकीसाठी पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या मागविण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.

Selection of market committees as per the new rules ... Coordinator's order, and the work of preparing lists | नव्या नियमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुका घ्या़....सहकार खात्याचे आदेश, याद्या तयार करण्याचे काम सुरू

नव्या नियमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुका घ्या़....सहकार खात्याचे आदेश, याद्या तयार करण्याचे काम सुरू

Next
ठळक मुद्देबाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारीसोलापूर व बार्शी बाजार समिती सचिवांना कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या तयार करण्याचे आदेशबाजार समित्यांच्या सचिवांनी कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या जिल्हा उपनिबंधकांना सादर करावयाच्या आहेत


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २०: नव्या कायद्यानुसार होणाºया बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी असतील तसेच निवडणुकीसाठी पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या मागविण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.
राज्यातील भाजपा सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिला असून, त्यासाठीची नियमावली निश्चित झाली आहे. शेतकºयांना मतदानाच्या नियमावलीसाठी सहकार खात्याकडे २० हरकती आल्या होत्या. त्या हरकती विचारात घेऊन शासनाने निवडणुकीसाठी पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांची यादी करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने आता सरसकट सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी असतील, हे स्पष्ट केले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या पत्रात काही बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रकरणे उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट झाल्याने उच्च न्यायालयाने विशिष्ट दिनांकापर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश केल्याने निवडणुकीची पूर्वतयारी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. जुन्या नियमानुसार पाच कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक जिल्हाधिकारी नियुक्त करतील त्या महसूल खात्याचे अधिकारी तर लहान बाजार समित्यांच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधक घेत होते. नव्या नियमानुसार सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर आहे. 
-------------------
याद्या करण्याचे काम सुरू
- बाजार समित्यांच्या सचिवांनी कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या जिल्हा उपनिबंधकांना सादर करावयाच्या आहेत. 
- बाजार समित्यांच्या सचिवांकडून आलेल्या गावांच्या याद्या जिल्हाधिकाºयांना सादर करावयाच्या असून, जिल्हाधिकारी त्या- त्या गावातील शेतकºयांची यादी गणनिहाय तयार करुन घेणार आहेत.
- या याद्यांनुसार बाजार समिती क्षेत्राचे १५ गणांमध्ये विभाजन केल्यानंतर त्यापैकी पाच गण लॉटरी पद्धतीने(महिलांसाठी-२, इतर मागास, विमुक्त जाती-भटक्या जमाती व अनुसूचित जाती-जमाती प्रत्येकी एक असे एकूण पाच) आरक्षित करतील.
- गणांची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांची गणनिहाय यादी तयार करण्याची जबाबदारी बाजार समितीवर सोपवतील.
- यादीत समावेश होणाºया शेतकºयाला किमान १० आर जमीन असणे आवश्यक आहे तसेच त्याचे वय डिसेंबर १७ रोजी १८ वर्षे पूर्ण असावे.
- बाजार समितीचे सचिव जिल्हाधिकाºयांकडून आलेली शेतकºयांची यादी नियमानुसार तयार करुन शिवाय हमाल व मापाड्यांची यादी जिल्हाधिकाºयांना सादर करतील. 
--------------------
सोलापूर, बार्शी सचिवांना आदेश 
- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बाजार समितीची मुदत २१ फेब्रुवारी २०१८, बार्शी बाजार समिती प्रशासकाची मुदत ११ मार्च १८ तसेच सोलापूर बाजार समिती प्रशासकाची मुदत १६ एप्रिल १८ रोजी संपणार आहे. सोलापूर जिल्हा उपनिबंधकांनी सोलापूर व बार्शी बाजार समिती सचिवांना कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Selection of market committees as per the new rules ... Coordinator's order, and the work of preparing lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.