जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिदधू न्यामगौडा यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:47 AM2018-05-28T11:47:41+5:302018-05-28T11:55:30+5:30

Sadhshu Nyamgowda, MLA of Jamkhandi assembly constituency, passes away | जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिदधू न्यामगौडा यांचे अपघाती निधन

जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिदधू न्यामगौडा यांचे अपघाती निधन

Next

सोलापूर : विजापूर (राज्य - कर्नाटक) जिल्ह्यातील जमखंडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार सिदधू न्यामगौडा यांचे सकाळी अपघाती निधन झाले़ हा अपघात बागलकोट जिल्ह्यातील कलादगीजवळ झाला आहे़

मृत आमदार सिदधू न्यामगौडा हे आपल्या मतदारसंघातील कार्यक्रमासाठी दिल्लीहून गोवामार्गे आपल्या मतदारसंघात येत असताना कलादगीजवळ इनोव्हा गाडीचे टायर फुटून पुलाच्या कठडयाला  इनोव्हा कार धडकली़ या अपघातात आमदार सिदधू न्यामगौडा याच्या छातीस जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात एवढा विचित्र होता की इनोव्हा कार चक्काचूर झाली आहे़

घटनास्थळी विजापूर जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ पोलीसांनी भेट दिली़ त्यांच्यासोबत असलेले तीन साथीदार हे जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ कर्नाटकात भाजपचे उमेदवार कुलकर्णी यांचा पराभव केला होता़ 

Web Title: Sadhshu Nyamgowda, MLA of Jamkhandi assembly constituency, passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.