नाव बदलून आलेत ब्ल्यू व्हेलसारखे डेंजर गेम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 08:46 PM2017-08-12T20:46:06+5:302017-08-12T20:46:06+5:30

सोलापूर :  ब्ल्यू व्हेलसारख्या जीवघेण्या खेळाचे लोण भारतात अगदी मुंबई, इंदूरपर्यंत आल्यानंतर स्मार्ट फोनचे आकर्षण असलेल्या आपल्या लाडक्या मुलांना वाचविण्यासाठी पालक सरसारवले आहेत

Renaming dzenger game like Blue Whale! | नाव बदलून आलेत ब्ल्यू व्हेलसारखे डेंजर गेम!

नाव बदलून आलेत ब्ल्यू व्हेलसारखे डेंजर गेम!

Next


रविंद्र देशमुख : आॅनलाइन लोकमत
सोलापूर :  ब्ल्यू व्हेलसारख्या जीवघेण्या खेळाचे लोण भारतात अगदी मुंबई, इंदूरपर्यंत आल्यानंतर स्मार्ट फोनचे आकर्षण असलेल्या आपल्या लाडक्या मुलांना वाचविण्यासाठी पालक सरसारवले आहेत. मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºया या खेळाबद्दल जगभरात संतापाची लाट उसळल्यानंतर हे गेम आता ह्य अ सायलेंट हाऊसदह्ण, ह्य अ सी आॅफ व्हेल्सह्ण आणि ह्य वेक अप मी अ?ॅट ४.४० ए. एमह्ण या नावाने मुलांवर भूरळ घालत आहेत. सोशल मीडीयावरून या नवीन नावाच्या गेम्ससंदर्भात जोरदार जनजागरण केले जात असून, त्यातून मुलांना जगण्याची उमेद देणारे संदेश दिले जात आहेत.
मुंबईतील मनप्रीतच्या घटनेनंतर सोलापुरातील एक मुलगा या ह्यडेंजरह्णच्या गेमच्या नादी लागून घर सोडून निघून गेल्याची घटना ताजी असतानाच इंदूरमधील एका मुलाने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रसिध्दी माध्यमांमधून दररोज यासंदभार्तील वृत्त प्रसिध्द होत असल्यामुळे पालक मंडळी हवालदिल झाले आहेत.
सध्याच्या धकाधकीच्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी आई - वडीलांना नोकरी - व्यवसाय करावा लागतो. शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे गावठाण भागात राहणारे लोक शहराच्या उपनगरात दूर निवासासाठी गेलेले आहेत.  मुलांनाही शाळा, कॉलेजमध्ये घरापासून दूर दूर जावे लागत आहे. यास्थितीत मुलांच्या संपर्कात राहण्यासाठी पालक मुलांनाच्या हातात स्मार्ट फोन देत आहेत. मुलांनाही स्मार्ट फोन हवाच असतो; पण या फोनवरूनच ह्यब्ल्यू व्हेलह्णच्या मुलांच्या जीवावर उठणाºया ह्यलिंक्सह्ण येत आहेत. सोशल मीडीयावरून सुरू असलेल्या जनजागरण मोहिमेत मुले आणि पालकांना आणखी सावध करण्यात आले असून, त्यासंदर्भात व्हायरल झालेल्या एका व्हीडीओमध्ये ह्यब्ल्यू व्हेलह्णचे काय नामांतर झालेले आहे? नवीन गेम्सची नावे कोणकोणती आहेत? याची माहिती देण्यात आली आहे. ह्य अ सायलेंट हाऊसदह्ण, ह्य अ सी आॅफ व्हेल्सह्ण आणि ह्य वेक अप मी अ?ॅट ४.४० ए. एमह्ण या पयार्यी नावाच्या गेम्सपासूनही सावध राहावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
-------------------
सेम टु सेम टास्क
नाव बदलून आलेल्या गेम्समध्येही ह्यब्ल्यू व्हेलह्ण सारखीच कार्यपध्दती वापरण्यात आलेली असून, बारा ते सतरा वर्षे वयोगटाच्या मुलांना आकर्षित करण्यात येत आहे. शिवाय गेमचा कालावधीही पन्नास दिवसांचा आहे. नवीन गेम्समध्येही पूर्वीच्याच गेमचा टास्क देण्यात येत आहे. त्यामध्ये हातावर ब्लेडने संख्या लिहा, मासा काढा, पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी झोपेतून उठून भयपट पाहा...आणि पन्नास दिवसांनी आत्महत्या करा, असे टास्क असल्याचे सोशल मीडीयातून व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
--------------
सोशल मीडीयाचे कौतुक!
ब्ल्यू व्हेलविरोधात सोशल मीडयावरून नागरिक जनजागरण करीत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. सायबर क्राईम विभागाकडूनही सध्या हे काम केले जात आहे. शहरातील शाळांमध्ये जाऊन या गेमच्या विरोधात जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.

Web Title: Renaming dzenger game like Blue Whale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.