सोलापुरातील रेल्वे बोगद्यांमध्ये साचलेले पावसाचे पाणी जैसे थे !

By Appasaheb.patil | Published: June 27, 2019 04:09 PM2019-06-27T16:09:38+5:302019-06-27T16:20:44+5:30

वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Rain water in Solapur was like rain water! | सोलापुरातील रेल्वे बोगद्यांमध्ये साचलेले पावसाचे पाणी जैसे थे !

सोलापुरातील रेल्वे बोगद्यांमध्ये साचलेले पावसाचे पाणी जैसे थे !

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी सोलापुरात झालेल्या मुळसधार पावसामुळे अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहेशहरातील चार ते पाच रेल्वे बोगद्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे त्या भागातील वाहतूक ठप्पदरवर्षी पाऊस पडला की असा प्रकार घडत असतो. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : दोन दिवसांपूर्वी सोलापुरात झालेल्या मुळसधार पावसामुळे अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. शहरातील चार ते पाच रेल्वे बोगद्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे त्या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरवर्षी पाऊस पडला की असा प्रकार घडत असतो. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

पावसाळा सुरू झाला की, नागरिकांच्या अडचणीत वाढ होते़ साहजिकच शासकीय अधिकाºयांकडे तक्रारी करणाºया नागरिकांची संख्यादेखील तितकीच वाढते़ नळाला घाण पाणी येते, सखल भागात पाणी साचते, पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने घराकडे जाण्यास रस्ता नाही, चार दिवस झाले लाईट नाही, ड्रेनेजचे घाण पाणी घरात शिरत आहे, अशा अनेक तक्रारी ऐकावयास मिळतात़ 
सोलापूर हे १२ लाख लोकसंख्या असलेले मोठे शहर आहे़ या शहरात विमानसेवेबरोबरच रेल्वे सेवेने मोठे जाळे निर्माण केले आहे़ कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेशासह महत्त्वाच्या राज्यांना जोडणाºया गावांना रेल्वेने मदत केली आहे़ सोलापूर हे मध्य रेल्वे विभागातील महत्त्वाचं स्थानक आहे़ या स्थानकावरून दररोज किमान शेकडो रेल्वे गाड्या या शहरातून ये-जा करतात़ या रेल्वेच्या जाळ्यामुळे सोलापूर शहराचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडले आहेत़ पूर्व भागातील लोकांना पश्चिम भागात तर पश्चिम भागातील लोकांना पूर्व भागात येण्यासाठी रेल्वेने बोगद्याची निर्मिती केली़

कल्याणनगर पुलाखाली पाणीच पाणी
 - कल्याण नगर परिसरातील रेल्वे पुलाची निर्मिती १५ डिसेंबर २०१८ रोजी झाली़ पूल झाल्याने या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता़ या भागातील लोकांना त्या भागात जाण्यासाठी रस्ता निर्माण झाल्याने अनेकांनी रेल्वेचे आभार देखील मानले़ मात्र, सध्या पावसाळ्यात याच रेल्वे पुलाखाली पाणी साचत असल्यामुळे अनेकांनी रेल्वेच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे़ कल्याण नगर पुलाखाली पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे़ शिवाय जुळे सोलापुरातील शाळांना जाण्यासाठी होटगी, मजरेवाडी, विमानतळ, कल्याण नगर, नई जिंदगी, आसरा या परिसरातील विद्यार्थी दररोज ये-जा करतात़ याशिवाय या पुलातून साखर कारखान्यांना जाणाºया उसाच्या गाड्या, मालवाहतूक, कामगार मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र, पुलाखाली साचल्याने या साºयाची वाहतूक ठप्प झाली आहे़ या वाहनांना पर्यायी दुसरा मार्गही नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली़ यामुळे पर्यायी मार्गाच्या शोधात नागरिक  दोन किलोमीटर अंतर कापत आसरा पुलावरून वहिवाट करतात़ याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळेवर, मजुरांच्या रोजगारावर व वाहतुकीवर होत आहे़ 

रामवाडी पुलाखाली पाणी
- रामवाडी पूल हा आकाराने मोठा आहे़ या पुलाखालून दुहेरी वाहतूकही आहे, मात्र पावसाळ्यात या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचते़ याठिकाणी पाणी जाण्यासाठी मार्ग काढून दिला असला तरी ते पाणी पुढे सरकत नसल्याने या परिसरात पावसाळ्यात नेहमीच पाणी साचते़ विशेषत: या पुलातून पाणी झिरपते, पुलाला धोका निर्माण होतो़ पुलाखाली पाणी साचत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ 

कोणताच पूल समान उंचीचा नाही
- रेल्वे रुळामुळे पुलांची निर्मिती झाली आहे़ मात्र, शहर परिसरात बांधण्यात आलेला एकही पूल समान उंचीचा नाही़ सर्वच पूल कमी-अधिक उंचीचे आहेत. कोणत्याही पुलाखालून जडवाहने जात नाहीत़ काही पूल असे आहेत की, त्या पुलाखालून फक्त दुचाकीच जातात. या अनेक अडचणींमुळे शहरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे़ 

शहर विस्कळीत
- शहराचा पूर्व व पश्चिम भाग हा रेल्वेमुळे निर्माण झाला आहे़ पश्चिम भागातील लोकांना पूर्व भागात येता येत नाही तर पूर्व भागातील लोकांना पश्चिम भागात येता येत नाही़ त्यामुळे शहर विस्कळीत झाले आहे़ या रेल्वेच्या जाळ्यामुळे शहराचे दोन भाग पडले आहेत़ 

कुमठे पूलाबाबत अनेक त्रुटी...
- डिसेंबर २०१८ पूर्वी कुमठे येथील रेल्वे पूल तयार झाला आहे़ पूल तयार होत असताना या पुलाबाबतच्या अनेक त्रुटी माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना सांगितल्या होत्या; मात्र तरीही रेल्वेने हा पूल बांधला़ आता पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे़ बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘लोकमत’ची टीम या पुलाजवळ पोहोचली असता या पुलावरील चढावर वाहने चढत नव्हती. पुलाखाली पाणी साचले होते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीच व्यवस्था केली नसल्याचे दिसून आले़ दरम्यान, पुलाखाली साचलेल्या पाण्यासाठी वाट काढून दिली आहे तीही गैरसोयीची असल्याचे निर्दशनास आले़ पुलातील पाणी पुढे सरकत नाही़ वाहने थांबत नाहीत, दोन वाहनांमध्ये अपघात होतो, पादचाºयाची वहिवाट या पुलाखालून होत नसल्याचे परिसरातील लोकांकडून सांगण्यात आले़ 

दमाणी नगर पूल
- दमाणी नगर परिसरात असलेला रेल्वेचा पूल हा अत्यंत कमी उंचीचा आहे़ अर्थात जवळपास ४ फूट उंचीचा आहे़ या पुलाखालून वाहनधारकाला मान खाली घालून वाहन ओढून घेऊन जावे लागते़ पावसाळ्यात या पुलाखालीही मोठ्या प्रमाणात पाणी साचते़ या पुलाच्या दोन्ही बाजूकडील पाणी पुढे सरकत नाही. कारण हा पूलच मुळात खड्ड्यात असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले़ 

कोणत्याच पुलाखाली दिवे नाहीत
 - सोलापूर शहरातून रेल्वेचे जाळे पसरले आहे़ या जाळ्यामुळे शहराचे दोन भाग पडले आहेत़ सोलापूर परिसरात रेल्वेचे बोगदे (पूल) तयार करण्यात आले़ मात्र, रेल्वे प्रशासनाला एकाही पुलाखाली विजेचा दिवा बसविणे गरजेचे वाटले नाही़ त्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलाखालून प्रवास करताना अनेक वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागते़ 

Web Title: Rain water in Solapur was like rain water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.