ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाºया वाहनांना रोखा, ‘स्वाभिमानी’ची आरटीओंकडे कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:01 PM2017-11-16T13:01:22+5:302017-11-16T13:05:18+5:30

सोलापूर जिल्ह्यात ओव्हरलोड ऊस वाहतूक त्वरित बंद करुन चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना तसे निवेदन देण्यात आले.

Prevent vehicles that overload sugarcane traffic, demand for action against 'self-respecting' RTOs | ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाºया वाहनांना रोखा, ‘स्वाभिमानी’ची आरटीओंकडे कारवाईची मागणी

ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाºया वाहनांना रोखा, ‘स्वाभिमानी’ची आरटीओंकडे कारवाईची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देऊस पुरवठा करणारी वाहने जादा क्षमतेने उसाची वाहतूक करीत आहेतजिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर ओेव्हरलोड वाहतूक केल्याच्या पावत्या उपलब्धअवैध ऊस वाहतूक करणाºयांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये


आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुर्डूवाडी दि १६ : सोलापूर जिल्ह्यात ओव्हरलोड ऊस वाहतूक त्वरित बंद करुन चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना तसे निवेदन देण्यात आले. 
ऊस पुरवठा करणारी वाहने जादा क्षमतेने उसाची वाहतूक करीत आहेत. ट्रॅक्टरला दोन ट्रॉलीची परवानगी नसताना २६ टन उसाची वाहतूक होत आहे. वाहनचालकांकडे परवाना आणि कागदपत्रे नसतात. प्रत्येक वाहनाची आर/टी.सी/पी.व्ही.सी. परवाना कागदपत्रे तपासावीत, पासिंग, इंडीकेटर, रिफ्लेक्टर न लावलेल्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्ते खराब होत आहेत. अशा वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर ओेव्हरलोड वाहतूक केल्याच्या पावत्या उपलब्ध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अवैध ऊस वाहतूक करणाºयांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये.  येत्या ७ दिवसात कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे.  निवेदनावर शिवाजी पाटील, महामूद पटेल, सत्यवान गायकवाड, महावीर सावळे, उमाशंकर पाटील आदींच्या स्वाक्षºया आहेत.  

Read in English

Web Title: Prevent vehicles that overload sugarcane traffic, demand for action against 'self-respecting' RTOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.