पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणीचा प्रसाद अडीच रुपयांनी महागला, पाच रुपयांचा लाडू साडेसात रुपयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 12:30pm

 विठ्ठलाला गरिबांचा देव म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गरिबांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडूचा दर मंदिर समितीने अडीच रुपयांनी वाढविला आहे.

आॅनलाइन लोकमत सोलापूर पंढरपूर दि ३ :  विठ्ठलाला गरिबांचा देव म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गरिबांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडूचा दर मंदिर समितीने अडीच रुपयांनी वाढविला आहे. यामुळे विठ्ठल भक्तांना आता महागलेल्या दरात म्हणजे साडेसात रुपयांना लाडू खरेदी करावा लागत आहे. भाविकांना श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून गावी नेता यावा यासाठी बुंदी लाडू बनविण्याचे आणि त्याची अल्पदरात विक्री करण्याचे काम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून होत होते. ना नफा ना तोटा या तत्त्वावर आतापर्यंत बुंदी लाडूची निर्मिती करुन त्याची विक्री केली जात होती.   बुंदीच्या दोन लाडूंसाठी भाविकांना प्रत्येकी पाच रुपयांप्रमाणे १० रुपये द्यावे लागत. मात्र आता त्यासाठी भाविकांना प्रत्येकी साडेसात रुपयांप्रमाणे दोन लाडूंसाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. लाडू बनविण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात आले आहे. पूर्वीपेक्षा लाडूचे वजनदेखील वाढविण्यात आले आहे. --------------------- लाडूच्या वजनात २० ग्रॅमने वाढ... - मंदिर समितीकडून प्रत्येकी पन्नास ग्रॅम वजनाचे दोन लाडूचे पॅकेट दहा रुपयांना प्रसाद म्हणून दिले जात होते तर आता टेंडरव्दारे नेमलेल्या संस्थेकडून प्रत्येकी सत्तर ग्रॅम वजनाचे लाडू बनविले जात आहेत. त्यामुळे लाडूचे वजनदेखील वाढलेले आहे. आताच्या लाडूमध्ये विलायची तसेच बेदाण्याचादेखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच लाडूच्या किमतीमध्ये पाच रुपयांची वाढ झाल्याचे मंदिर समितीकडून सांगितले जात आहे. 

संबंधित

सोलापूर जिल्ह्यातील बंदलगी बंधारा बनला राजकीय पर्यटनस्थळ, पाण्याविना हाल, शेतकºयांमध्ये मात्र संतापाची भावना
काळानुरुप बदल करा तरच उद्योग टिकतील, करण शहा यांचे आवाहन, सोलापूरातील अभिजित कदम मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले उद्योगातील अनुभव
सोलापूर जिल्ह्यात पाणलोटच्या कामास कृषी खात्याचा निरुत्साह, दोन वर्षात दोन कोटी खर्च तर साडेचार कोटी शिल्लक: खर्च होत नसल्याने दुसरीकडे वर्ग 
सोलापूर जिल्हा न्यायालयातील फौजदारी खटल्यात शिक्षेचे प्रमाण वाढले, माहिती अधिकारात सत्यता उघड
सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव

सोलापूर कडून आणखी

सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामावर महापालिकेचा हातोडा, पाच ठिकाणी पाडकाम सुरू, ३४० मिळकतदारांना दिल्या नोटिसा
सोलापूर जिल्ह्यात वाळू टंचाईचा पेच कायम, सीनेतील वाळू उपशाचे प्रस्ताव फेटाळले ! महसूल आणि भूजल विभागात पुन्हा जुंपली 
एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले, सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
राज्याच्या ऊस गाळपात सोलापूरचा २० टक्के वाटा, ३० कारखान्यांचे गाळप ९४ लाख मे.टन, राज्यात १८२ साखर कारखाने सुरू
सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीसाठी नेमके मतदार कोण ? निवडणूक प्रक्रियेत पेच, निवडणूक कार्यालयाचे प्राधिकरणाला पत्र

आणखी वाचा