करमाळा बाजार समितीसाठी ९ सप्टेंबर रोजी होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 03:47 PM2018-08-07T15:47:31+5:302018-08-07T15:49:00+5:30

११ सप्टेंबरला मतमोजणी: बुधवारपासून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया

Polling to be held on September 9 for Karmala Bazar committee | करमाळा बाजार समितीसाठी ९ सप्टेंबर रोजी होणार मतदान

करमाळा बाजार समितीसाठी ९ सप्टेंबर रोजी होणार मतदान

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांनी करमाळा बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाबाजार समितीमध्ये १८ संचालक पदासाठी निवडणूक मतदार यादीत १ लाख १५ हजार १८३ मतदारांचा समावेश

करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. बुधवारी ८ आॅगस्टपासून १३ आॅगस्टअखेर उमेदवारी अर्ज दाखल क रता येणार आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार ८ ते १३ आॅगस्टपर्यंत तहसील कार्यालय, करमाळा येथे उमेदवारी अर्ज दाखल करणे, १४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा.

उमेदवारी अर्जांची छाननी, ३० आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेणे, निवडणूक लढविणाºया उमेदवारांची अंतिम यादी ३१ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करणे. रविवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, मतमोजणी मंगळवारी ११ सप्टेंबर रोजी शासकीय धान्य गोडावून, करमाळा येथे सकाळी १० वा. पासून करण्यात येणार आहे. 

एक लाख १५ हजार १८३ मतदार
- करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ संचालक पदासाठी निवडणूक घेतली जात असून , शेतकरी प्रतिनिधी गट जातेगाव, पोथरे, रावगाव, वीट, सावडी, जिंती, राजुरी, वाश्ािंबे, उमरड, झरे, हिसरे, साडे, केम, वांगी, कंदर हे १५ गट असून, अडते व्यापारी २ तर हमाल-तोलार एक याप्रमाणे संचालक निवडले जाणार आहेत. बाजार समितीच्या निवडणूक मतदार यादीत १ लाख १५ हजार १८३ मतदारांचा समावेश आहे.

Web Title: Polling to be held on September 9 for Karmala Bazar committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.