Police constable molested, Solapur City incident |  पोलीसांनीच केला महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग, सोलापूर शहरातील घटना
 पोलीसांनीच केला महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग, सोलापूर शहरातील घटना

सोलापूर : सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबलनेच महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री घडली़ पिडीत महिलेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभिजित यल्लादास वामने याविरूध्द भादंवि ३५४ (अ), ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिडीत महिलेचा पती तिच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आला होता़ तो डब्बा घेण्यासाठी पिडीत महिला बाहेर आली असता आरोपीने तिचा विनयभंग केला़

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावंत, नरसिंग अंकुशकर, सपोनि साळी यांनी भेट दिली़ या घटनेचा अधिक तपास सपोनि भोसले हे करीत आहेत़


Web Title: Police constable molested, Solapur City incident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.