पोलीस चालवित असलेल्या कारने तिघांना उडविले, तिघेही जखमी, सोलापूर शहरातील घटना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:25 AM2017-12-18T11:25:55+5:302017-12-18T11:27:03+5:30

लकी चौकात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हे चालवित असलेल्या कारने तिघांना उडविले़ या अपघातात एक जण गंभीर झाले असून अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़

Police cars hurled three people, injures all three, incident in Solapur City! | पोलीस चालवित असलेल्या कारने तिघांना उडविले, तिघेही जखमी, सोलापूर शहरातील घटना !

पोलीस चालवित असलेल्या कारने तिघांना उडविले, तिघेही जखमी, सोलापूर शहरातील घटना !

Next
ठळक मुद्दे- पोलीस कारचालकास नागरिकांनी चोपले- संतप्त नागरिकांनी कार फोडली- अन्य नागरिक बालबाल बचावले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : येथील लकी चौकात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हे चालवित असलेल्या कारने तिघांना उडविले़ या अपघातात एक जण गंभीर झाले असून अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़
लकी चौकातून सरस्वती चौकाकडे निघालेल्या कारने तिघांना उडविले़ या अपघातात रस्त्यांवर असलेले अनेक नागरिकांचे प्राण वाचले़ या घटनेनंतर संतप्त जमावांनी कार फोडली़ कारचालक पोलीस कर्मचाºयास नागरिकांनी मारल्याची माहिती समोर आली़ या अपघातातील जखमींवर सोलापूरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़ 

Web Title: Police cars hurled three people, injures all three, incident in Solapur City!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.