कमिशन खोरांनो.. दलाल चोरांनो.. 2022 मध्ये चौकीदाराच्या हस्तेच 30 हजार घरांचे उद्घाटन होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 12:58 PM2019-01-09T12:58:22+5:302019-01-09T13:07:53+5:30

जनतेच्या विकासाऐवजी केवळ राजनीतीतच गुरफटलेल्या कमिशनखोर अन् दलालखोर विरोधकांना देशाची चिंता नाही अशी टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खुले आव्हान दिले की, 2022 मध्येही मीच सोलापुरातील तीस हजार घरांचे पंतप्रधान म्हणून उद्घाटन करणार.

PM Modi in Solapur : Quota bill is a strong answer to those spreading lies, says PM Modi | कमिशन खोरांनो.. दलाल चोरांनो.. 2022 मध्ये चौकीदाराच्या हस्तेच 30 हजार घरांचे उद्घाटन होणार!

कमिशन खोरांनो.. दलाल चोरांनो.. 2022 मध्ये चौकीदाराच्या हस्तेच 30 हजार घरांचे उद्घाटन होणार!

Next
ठळक मुद्देजनतेच्या विकासाऐवजी केवळ राजनीतीतच गुरफटलेल्या कमिशनखोर अन् दलालखोर विरोधकांना देशाची चिंता नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.2022 मध्येही मीच सोलापुरातील तीस हजार घरांचे पंतप्रधान म्हणून उद्घाटन करणार - नरेंद्र मोदी राज्यातील प्रत्येक घराला वीज देण्यासाठी खूप गांभीर्याने काम करत असल्याबद्दल फडणवीस सरकार यांचेही त्यांनी कौतुक केले.

सोलापूर - जनतेच्या विकासाऐवजी केवळ राजनीतीतच गुरफटलेल्या कमिशनखोर अन् दलालखोर विरोधकांना देशाची चिंता नाही अशी टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खुले आव्हान दिले की, 2022 मध्येही मीच सोलापुरातील तीस हजार घरांचे पंतप्रधान म्हणून उद्घाटन करणार.

वेगवेगळ्या 6 विकास कामांच्या भूमिपूजन अन् लोकार्पण सोहळ्यासाठी ते आज सोलापुरात आले, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या स्टेडियमवर हजारो लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच मैदानाबाहेर सुमारे अर्धा किलोमीटर परिसरातही रस्त्यावर लोक उभारले होते.

लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी, सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे संत दामाजीपंत या सर्वांना मी नमस्कार करतो, अशी आपल्या भाषणाची मोदी यांनी सुरुवात केली. चार हुतात्मे अन् कोटणीस यांचेही त्यांनी स्मरण केले.

राज्यातील प्रत्येक घराला वीज देण्यासाठी खूप गांभीर्याने काम करत असल्याबद्दल फडणवीस सरकार यांचेही त्यांनी कौतुक केले. सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी दिली असून यामुळे आई तुळजाभवानी भक्तांना खूप फायदा होणार आहे.

मंगळवारी (8 जानेवारी) रात्री लोकसभेत गोरगरीब सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला, असे त्यांनी सांगितले, तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. मोदी म्हणाले की याचा अर्थ नक्कीच काल रात्री दीड वाजेपर्यंत तुम्हीही जागून लोकसभेचे लाईव्ह पाहिले आहे. आज बुधवारी राज्यसभेत या आरक्षणाचा ठराव मंजूर होईल, त्यासाठी विशेष बाब म्हणून अधिवेशनाची वेळही वाढविण्यात आली आहे. मागासवर्गीय, आदिवासी अन भारत ओबीसी वर्गाला कदापिही त्रास न होऊ देता सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे विरोधकांना करारा जबाब दिला आहे, असेही मोदी म्हणाले.

आम्ही दिखाव्यासाठी काम करत नाही. कामाचे नुसतेच भूमिपूजन करून निवडणुकीची वेळ मारून नेणाऱ्या विरोधकांसारखे आमचे काम नाही. जिथे आम्ही भूमिपूजन करतो तिथं लोकार्पण सोहळा आम्हीच करतो, हे लक्षात ठेवा.  सोलापुरातील तीस हजार घरांचे उद्घाटनही 2022 मध्ये मीच करणार, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोदी यांना पुणेरी पगडी, घोंगडं, भगवद्गीता अन् तलवार देण्यात आली. दोनशे वर्षांपूर्वी हाताने लिहिलेली भगवद्गीता मोदींनी उघडून आवर्जून पाहिली. पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शरद बनसोडे, माजी आमदार नरसय्या आडम अन महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

'मकरसंक्रात-गड्डा यात्रा'निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, अशा मराठी भाषेत नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या  'तिळगुळ घ्या.. गोडगोड बोला,' असे सांगतानाच त्यांनी कन्नडमध्येही शुभेच्छा दिल्या. 'बोला हर बोलाss' म्हणत त्यांनी भाषणाचा शेवट केला.

Web Title: PM Modi in Solapur : Quota bill is a strong answer to those spreading lies, says PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.