PM Modi In Solapur : ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 11:00 AM2019-01-09T11:00:46+5:302019-01-09T16:45:27+5:30

सोलापूर - पंतप्रधान  नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी ...

PM Modi In Solapur : ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो - नरेंद्र मोदी | PM Modi In Solapur : ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो - नरेंद्र मोदी

PM Modi In Solapur : ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो - नरेंद्र मोदी

Next

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी सोलापुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच, शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून, ठिकठिकाणी नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 

या दौऱ्यात सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचे उद्घाटन, तसेच माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे तब्बल 30 हजार असंघटित कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची पायाभरणी, उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे भूमिपूजन, सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस, केंद्रीय वाहतुक व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के.विद्यासागरराव यांच्यासह भाजपामधील वरिष्ठ नेतेमंडळी तसेच मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.

01:08 PM

2022 मध्येही मीच सोलापुरातील तीस हजार घरांचे पंतप्रधान म्हणून उद्घाटन करणार - नरेंद्र मोदी



 

12:53 PM

'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, सगळ्यांना मकरसंक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा,' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:50 PM

हेलिकॉप्टर घोटाळ्यात ज्या दलालाला परदेशातून आणलं, तो केवळ हेलिकॉप्टरच्या डीलमध्ये सहभागी नव्हता, तर आधीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत लढाऊ विमानांचा जो सौदा केला जात होता, त्यातही त्याची भूमिका होती - नरेंद्र मोदी

12:48 PM

भाजपा सरकारकडून सर्वांना समान न्याय देण्याचं काम- पंतप्रधान मोदी

12:45 PM

शहरांच्या स्वच्छतेप्रमाणेच मी सरकारमध्येही स्वच्छता केली आहे - मोदी

12:40 PM

30 हजार घरांची योजना लवकरात लवकर पूर्ण करणार, विडी कामगार, रिक्षाचालकांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश - पंतप्रधान मोदी

12:33 PM



 

12:32 PM

घरांच्या योजनांचं उद्घाटन केलं, घराची चावी सुपूर्द करायला मीच येणार - नरेंद्र मोदी

12:32 PM

राष्ट्रहिताचे मोठमोठे निर्णय घेण्याची गरज, सबका साथ सबका विकास हाच आमचा नारा - नरेंद्र मोदी

12:28 PM

52 हजार किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांवर काम सुरु - पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:26 PM



 

12:26 PM

विकासकामांतून स्थानिकांना रोजगाराच्या संधी, भाजपने कधीच दिखाऊपणा केला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:24 PM

विकासकामांतून स्थानिकांना रोजगाराच्या संधी, भाजपने कधीच दिखाऊपणा केला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:22 PM

ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:18 PM

दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणातून कोणी काही घेऊ शकत नाही. आम्ही 10 टक्के आरक्षण देऊन सगळ्यांना न्याय दिला आहे - नरेंद्र मोदी

12:16 PM


12:14 PM

आर्थिकदृष्ट्या गरीब मागासांना 10 टक्के आरक्षण देऊन सबका साथ सबका विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे - नरेंद्र मोदी

12:14 PM

10 टक्के आरक्षणातून सवर्ण गरिबांना विकासाची संधी मिळेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:12 PM

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजुरी, तुळजाभवानीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना फायदा - नरेंद्र मोदी

12:08 PM

सोलापूरचे ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे संत दामाजी पंत यांना साष्टांग नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात मराठीतून भाषणाला सुरुवात

12:07 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात

11:58 AM



 

11:54 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण

11:50 AM

सोलापूर : गरिबांसाठी 30 हजार घरं तयार होत आहेत - मुख्यमंत्री

11:48 AM

याआधी कोणतेही पंतप्रधान तीन वेळा सोलापूरला आले नाहीत - मुख्यमंत्री

11:48 AM

प्रत्येक भेटीत पंतप्रधान मोदी सोलापूरला खूप काही देऊन गेले - मुख्यमंत्री

11:47 AM

संपूर्ण सोलापुरात लवकरच 24 तास पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

11:43 AM

सोलापूर ही कर्मयोगी लोकांची भूमी - मुख्यमंत्री

11:40 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशा शब्दात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली

11:26 AM

30 हजार घरं मजुरांना दिल्याने मोदींचे आभार, 60 वर्षानंतरचं स्वप्न आज साकार होतंय - नरसय्या आडम 

11:22 AM

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोलापुरात आगमन, मुख्यमंत्री फडणवीसांनी पुणेरी पगडी देऊन केलं मोदींचं स्वागत

11:08 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये दाखल 

11:06 AM

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर होम मैदानावरील हेलिपॅड येथे दाखल

11:04 AM



 

11:04 AM



 

Web Title: PM Modi In Solapur : ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो - नरेंद्र मोदी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.