कर्जमाफीचे साडेसहा हजार कोटीहून अधिक रक्कम बँकाकडे पडून, कर्जमाफीची रक्कम परत देण्याच्या सुचना !

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, January 02, 2018 2:12pm

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी विविध बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पडून असलेल्या रकमा परत करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. अशा प्रकारची साडेसहा हजार कोटींहून अधिक रक्कम बँकांकडे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.

अरुण बारसकर सोलापूर दि २  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी विविध बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पडून असलेल्या रकमा परत करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. अशा प्रकारची साडेसहा हजार कोटींहून अधिक रक्कम बँकांकडे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करत नसाल तर ती परत पाठवून द्या, अशा सूचना शासनाने आज बँकांना दिल्या आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे शासनाने पैसे दिले आहेत. राष्टÑीयीकृत तसेच जिल्हा मध्यवती  बँकांना शासनाने शेतकºयांची ‘ग्रीन’ यादी सोबत पैसेही दिले आहेत. कर्जमाफीच्या चार याद्या बँकांना दिल्या असून यापैकी पात्र शेतकºयांच्या खात्यावर बँकांनी पैसे जमा केले आहेत. आॅनलाईन केलेल्यापैकी शासनाने बँकांना दिलेल्या याद्यांच्या तपासणीत त्रुटी आढळलेल्या शेतकºयांची यादी शासनाला परत पाठविण्यात आली आहे. या सर्व प्रकारात बँकांनी पात्र शेतकºयांच्या खात्यावरही रकमा जमा केल्या नसल्याने शिल्लक रक्कम शासनाकडे जमा करण्याच्या सूचना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बँकेच्या अधिकाºयांना दिल्या आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत शिल्लक रक्कम परत जमा करण्यास सांगण्यात आले होते.  ------------------ ११ हजार शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा - शुक्रवारपर्यंत शासनाने राष्टÑीयीकृत व जिल्हा बँकांना  ३९ लाख ८९ हजार ७२९ शेतकºयांची यादी व १७ हजार ७०५ कोटी ७० लाख १४ हजार ८२८ रुपये दिले होते.  - बँकांनी सोमवारपर्यंत २९ लाख  १  हजार   शेतकºयांच्या  खात्यावर ११ हजार ४६८  कोटी  रु पये जमा केले  असल्याचे  सांगण्यात   आले. - शुक्रवारपर्यंत राष्टÑीय बँकांना दिलेल्या यादीपैकी ५ लाख ६७ हजार २०५ व जिल्हा बँकांनी ७ लाख ७ हजार २३८ शेतकºयांच्या खात्यावर जमा केली नव्हती. - शुक्रवारपर्यंत राष्टÑीय बँकांकडे ३३७८ कोटी ९१ लाख ८८ हजार ६२९ रुपये तर जिल्हा बँकेकडे  ४९४५ कोटी ८९ लाख ७ हजार ८३३ रुपये असे ६६८० कोटी ६८ लाख २२ हजार २६३ रुपये शिल्लक होते.  ----------------- सोलापुरात २५० कोटी शिल्लक  सोलापूर जिल्ह्यासाठी राष्टÑीय व जिल्हा बँकेला दिलेल्या एक लाख ४७ हजार ५९७ शेतकºयांची यादी व ७२९ कोटी ४३ लाख ८९ हजार ९५८ रुपये दिले होते. यापैकी बँकांनी शुक्रवारपर्यंत ८० हजार १९८ शेतकºयांच्या खात्यावर ४३५ कोटी ९९ लाख ५९ हजार ६६४ रुपये जमा करुन ६७ हजार ३९९ शेतकरी व २९३ कोटी ४४ लाख ३० हजार २९४ रुपये शिल्लक होते. सोमवारपर्यंत २५० कोटींपर्यंत रक्कम शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. --------------   ५६ लाख ५९ हजार कुटुंबांचे अर्ज  राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी कर्जमाफीसाठी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्यांची कुटुंबसंख्या ५६ लाख ५९ हजार इतकी होते. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेले व निकषात न बसणारे ८ लाख ३९ हजार खातेदार अपात्र ठरले. अर्ज भरलेल्यांपैकी ६८ लाख ९० हजार शेतकºयांचे अर्ज पात्र झाले आहेत.   

संबंधित

संतांच्या पालख्या पंढरीसमीप
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गटसचिवांचे अनोखे आंदोलन
संत विचारधारेविरोधात वक्तव्य करणाऱ्याविरूध्द कारवाई करा
तुळजापूर तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
रुपी बँकेच्या ‘ओटीएस’ला मुदतवाढ : सहकार विभागाचा निर्णय

सोलापूर कडून आणखी

आषाढी वारी विशेष ; तुकोबारायांच्या पालखीतही माऊलींच्या पादुका
आषाढी वारी विशेष ; डॉ. सुमेध अंदूरकर वारकºयांच्या आरोग्याचा सेवेकरी !
पंढरीचा वारकरी ; संप्रदायाचे वैभवही मानले जाते
बोलणेचि नाही । आता देवाविण काही ।।
आषाढी वारी विशेष ; जीवनात चैतन्य निर्माण करणारी आषाढी वारी!

आणखी वाचा