वाटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील २३५ गावांचा सहभाग

By Appasaheb.dilip.patil | Published: April 19, 2018 12:09 PM2018-04-19T12:09:43+5:302018-04-19T12:09:43+5:30

महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेस सोलापुरात प्रारंभ झाला

Participation of 235 villages in Solapur district in the water cup competition | वाटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील २३५ गावांचा सहभाग

वाटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील २३५ गावांचा सहभाग

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ३१४० गावात श्रमदानाचे काम जोमाने सुरूश्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारण, पाणलोटच्या कामास प्रारंभ

आप्पासाहेब पाटील
सोलापूर : महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेस सोलापुरात प्रारंभ झाला आहे़ यात सोलापूर जिल्ह्यातून २३५ गावांनी सहभाग नोंदवला असून १४० गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारण, पाणलोटच्या कामास प्रारंभ झाला आहे.
राज्यात वॉटरकप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे़ यात राज्यातील २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांतून ४ हजार ३० गावे यंदा स्पर्धेत सहभागी झाली आहेत. यात सोलापुरातील २४२ गावांचा सहभाग आहे़ मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर व सांगोला या दोनच तालुक्याने सहभाग नोंदविला होता़ यात उत्तर सोलापूरमधील ३० तर सांगोल्यातील ४७ गावांनी सहभाग नोंदविला होता़ स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ असा आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे़ याशिवाय प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. 
स्पर्धा तीन वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे़ स्पर्धेत भाग घेणाºया प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थींना पाणी फाउंडेशनने पाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील ४५ दिवसांत गावात श्रमदानाने तसेच मशिनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारुन पाणी साठवण क्षमता निर्माण करायची आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच सर्वच विभागाच्या शासकीय अधिकाºयांनी श्रमदानात सहभाग नोंदवित गावकºयांचा उत्साह वाढविण्याचे काम जोमाने सुरू केले आहे़
तालुकानिहाय सहभागी गावांचा तक्ता
तालुका     सहभागी गावे    श्रमदान गावे
- माढा    ४५    २५
- करमाळा    ४३    २६
- मंगळवेढा    ३५    १७
- उत्तर सोलापूर    ३४    २८
- सांगोला    ५१    १८
- बार्शी     ३४    २६
कामांच्या तपासणीनंतर होणार गुणदान
घरातून वाया जाणाºया पाण्यासाठी शोषखड्डे, पर्यावरण समतोल राखण्यासाठी गावाने रोपवाटिका तयार करून लोकसंख्येच्या दुप्पट वृक्षारोपण, जलसंधारणाच्या विविध कामासाठी श्रमदान व लोकसहभागातून यंत्राने विविध कामे, गावाचे माती परीक्षण, काडीपेटी मुक्त शिवार, गावाच्या पाण्याचे बजेट, नापेड प्रकल्प, माथा ते पायथा या तंत्राने जलसंधारणाची विविध कामे गावाने करायची आहेत. या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक, तसेच तालुकानिहाय एक प्रतिनिधी नेमण्यात आला आहे. तसेच पाणी फाउंडेशनची समिती गावनिहाय भेटी देऊन कामांची तपासणी करत गुणदान करणार आहे. त्यातून यशस्वी गावे निवडली जातील.
सोलापूर जिल्ह्यातील २३५ गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ३ यात सहभाग नोंदविला होता़ त्यापैकी १४० गावात श्रमदानाचे काम सुरू झाले आहे़ प्रत्येक गावात अंदाजे २ हजार ते ५ हजार पर्यंत लोक श्रमदान करीत आहेत़ याकामी बालाजी अमाईन्स कंपनीने तीन ठिकाणच्या कामासाठी जेसीबी उपलब्ध करून दिले आहेत. आणखीन जिल्ह्यातील संस्था, संघटना सहभागी होत आहेत़ गावे पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी श्रमदानात सहभागी व्हावे़
- विकास गायकवाड,
जिल्हा समन्वयक, पाणी फाउंडेशन, सोलापूऱ

Web Title: Participation of 235 villages in Solapur district in the water cup competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.