Panchayat Raj committee members on Solapur district tour | सोलापूर जिल्हा दौºयावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी मार्डी येथे घेतला हुरडा पार्टीचा आस्वाद 
सोलापूर जिल्हा दौºयावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी मार्डी येथे घेतला हुरडा पार्टीचा आस्वाद 

ठळक मुद्देराजेशाही थाटात राज्यातील विविध भागातून आलेल्या आमदारांनी रानमेव्यावर मनसोक्त ताव मारलाआमदारांना सोलापूरी चादर भेट देऊन स्वागत केले. 


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९  : सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या पंचायत राज समितीने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मार्डी येथे भारतीय जनता पाटीर्चे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या शेतात शिवार फेरीचे औचित्य साधून हुरड्याची चव चाखली.
राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे आग्रहाचे आमंत्रण स्विकारुन नियोजित शासकीय कामकाजात विस्कळीतपणा येऊ नये, यासाठी वेळेचे बंधन कटाक्षाने पाळत सकाळच्या पहिल्या प्रहारात शुक्रवारी पंचायत राज समितीने मार्डी येथे भारतीय जनता पाटीर्चे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या शेतात डेरेदाखल झाली. आणि राजहंस या प्रसिद्ध असलेल्या हुरड्याची मनसोक्त मेजवाणी घेतली.
    भव्य शामियाना...गाद्या आणि लोड समोर हुरडा भाजण्यासाठी पेटविलेल्या चार आकट्या...उभ्या महाराष्ट्रात हुरड्यासाठी खवय्यांच्या पसंदीत उतरेला राजहंस या वाणाचा हुरडा सोलापूरची प्रसिद्ध शेंगाचटणी, फरसाणा, लसूण घालून केलेले शेंगाचे कूट, गुळाचे खडे सोबतीला नान्नजची प्रसिद्ध द्राक्षं, अशी तोंडी लावण्यासाठी प्लेटमध्ये मांडलेली आरास अशा राजेशाही थाटात राज्यातील विविध भागातून आलेल्या आमदारांनी रानमेव्यावर मनसोक्त ताव मारला. त्यानंतर हुरडा सुकरपणे पचावा, यासाठी अट्टहास करुन बनविलेल्या मठ्ठयाचाही फुरका सा-यांनी मारला. न्याहरीची वेळ असल्यामुळे पवार बंधुंनी सेट डोसा पेपर डोसा,उपमा,जामून सोबतीला फ्रूट सॅलेट, असा न्याहरीला बेतही होता.
    पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे,बाशीर्चे आमदार दिलीप सोपल, पंढरपूरचे आमदार भारत भालके, आ.सुरेश खाडे, चरण वाघमारे, राहुल बोंद्रे, राहुल मोटे, विरेंद्र जगताप,आर.टी. देशमुख, सुधाकर भालेराव, दत्तात्रय सावंत असे आकरा आमदार या शिवार फेरी आणि हुरड्याच्या मेजवाणीत सहभागी झाले होते. ना.सुभाष देशमुख,शहाजी पवार, मनीष देशमुख, इंद्रजीत पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष काशीनाथ कदम, युवा मोचार्चे तालुकाध्यक्ष संभाजी दडे, कमलाकर माने, माडीर्चे उपसरपंच युवराज पवार,संजय इनामदार, कदीर कुडले, गणेश पवार यांनी आमदारांना सोलापूरी चादर भेट देऊन स्वागत केले. 


Web Title: Panchayat Raj committee members on Solapur district tour
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.