थकीत ऊस बिलासाठी प्रहार संघटना आक्रमक, सोलापूरात सहकारमंत्र्यांची प्रतिकात्मक काढली ‘प्रेतयात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 03:28 PM2018-09-24T15:28:04+5:302018-09-24T15:29:44+5:30

Pahar organization for overcrowded sugarcane bills, symbolic reminder of 'Sahyatra' | थकीत ऊस बिलासाठी प्रहार संघटना आक्रमक, सोलापूरात सहकारमंत्र्यांची प्रतिकात्मक काढली ‘प्रेतयात्रा’

थकीत ऊस बिलासाठी प्रहार संघटना आक्रमक, सोलापूरात सहकारमंत्र्यांची प्रतिकात्मक काढली ‘प्रेतयात्रा’

googlenewsNext
ठळक मुद्दे- ऊस उत्पादक शेतकºयांना एफआरपीची रक्कम मिळेना...- शासनासह सहकारमंत्र्यांचा शेतकरी संघटनांनी केला निषेध- रक्कम अदा करा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा दिला इशारा

सोलापूर : ऊसाचे थकीत बिल न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करीत प्रहार संघटनेने सहकारमंत्री यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली.

सोलापूर जिल्ह्यात सर्वच कारखानदारांना शेतकºयांची मागील वर्षी ऊस दिले़ पण एक वर्षे उलटत असला तरी अद्यापर्यंत शेतकºयांना ठरलेल्या एफआरपीची रक्कम मिळाली नाही़ त्यामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे़ वारंवार पाठपुरावा करूनही महाराष्ट्र शासन व त्यांचे मंत्री जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्यावतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करीत त्यांचीच प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून शासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय मस्के-पाटील, जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पप्पू नलावडे, शहर संपर्क जमीरभाई शेख, शहर कार्याध्यक्ष खालीद मनिकार, ताज बागवान, मुदस्सर हुंडेकरी, नवनाथ साळुंखे, बार्शी तालुकाप्रमुख मंगेश मुलगे, मंगळवेढा तालुकाप्रमुख राजकुमार स्वामी, विशाल मस्के, राम साळुंखे, योगेश कसबे, श्रीकांत वाघमारे, अजय देवकुळे, निखिल भोसलेसह असंख्य शेतकरी उपस्थित होते़.

Web Title: Pahar organization for overcrowded sugarcane bills, symbolic reminder of 'Sahyatra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.