सोलापूर जिल्ह्यातील १०३ गावांतील आॅनलाईन उतारे बिनचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 02:08 PM2017-08-23T14:08:38+5:302017-08-23T14:11:34+5:30

सोलापूर दि २३ : जिल्ह्यातील ११४४ गावांपैकी १०३ गावांतील आॅनलाईन उतारे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ४५१ गावांतील रेकॉर्ड तलाठ्यांनी तपासून मंडल अधिकाºयांकडे पाठविले आहेत. तर ११२ गावांतील रेकॉर्ड दुरूस्तीचे अहवाल मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे तपासणी पाठविण्यात आले आहेत.

Online polling in 103 villages of Solapur district is perfect | सोलापूर जिल्ह्यातील १०३ गावांतील आॅनलाईन उतारे बिनचूक

सोलापूर जिल्ह्यातील १०३ गावांतील आॅनलाईन उतारे बिनचूक

Next
ठळक मुद्देव्हेंडिंग मशीनचा वापर अद्याप कमीच आॅनलाईन उतारे दुरूस्तीची टक्केवारी नऊ आहे४५१ गावांतील रेकॉर्ड तलाठ्यांनी तपासून मंडल अधिकाºयांकडे पाठविले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : जिल्ह्यातील ११४४ गावांपैकी १०३ गावांतील आॅनलाईन उतारे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ४५१ गावांतील रेकॉर्ड तलाठ्यांनी तपासून मंडल अधिकाºयांकडे पाठविले आहेत. तर ११२ गावांतील रेकॉर्ड दुरूस्तीचे अहवाल मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे तपासणी पाठविण्यात आले आहेत.
आॅनलाईन उताºयात आणि तलाठ्याकडे असलेल्या दप्तरातील नोंदींमध्ये तफावत आढळून आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांच्या नोंदी तपासून अशा रेकॉर्डचे पुनर्संपादन करण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली आहे. त्यानुसार पहिला टप्पा १५ आॅगस्टचा ठरविण्यात आला होता. या काळात १०० गावांचे उद्दिष्ट होते. १५ आॅगस्टपर्यंत ७४ गावांमधील रेकॉर्डची आॅनलाईन दुरूस्ती करण्यात आली होती. आता या गावांची संख्या १०३ झाली आहे. 
एकूण गावांच्या प्रमाणात आॅनलाईन उतारे दुरूस्तीची टक्केवारी नऊ आहे. अक्कलकोट, मोहोळ, माढा, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील रेकॉर्ड दुरूस्ती झालेल्या गावांची संख्या अन्य गावांच्या तुलनेत अधिक आहे.
------------------------
व्हेंडिंग मशीनचा वापर अद्याप कमीच 
शेतकºयांना तत्काळ ७-१२ मिळावा यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांसाठी ७-१२ व्हेंडिंग मशीन सोलापुरातील सेतू केंद्रावर लावण्यात आली आहे. २० रुपयांची नोट टाकल्यावर त्यातून ७-१२ बाहेर पडतो. १५ आॅगस्टला या मशीनचे उद्घाटन झाले. मात्र शेतकºयांचा अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याची माहिती आहे. येथून किती शेतकºयांनी ७-१२ घेतला याची नोंद नसली तरी प्रतिसाद कमी असल्याचे सेतू कार्यालयाचे मत आहे.

Web Title: Online polling in 103 villages of Solapur district is perfect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.