आॅनलाईन चोरांचा सायबर सेलकडून छडा, सोलापूर शहर पोलीसांच्या सायबर सेलने मिळवून दिले २.७३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:32 PM2017-12-11T13:32:43+5:302017-12-11T13:36:14+5:30

आपल्या मोबालईवर अनोळखी नंबरवरुन फोन येतो. आपले एटीएम कार्डची माहिती विचारली जाते. अन्यथा आपले कार्ड बंद होईल असा इशारा दिला जातो. भीतीने आपण माहिती सांगतो अािण क्षणात आपल्या खात्यावरील पैसे वजा झाल्याचा संदेश येतो तेव्हा आपण अचानक घडलेल्या या प्रकाराने गोंधळून जातो. अशा वेळी पोलिसांच्या सायवर शाखेला त्वरीत कळवल्यास पैसे परत मिळवता येणे शक्य झाले

Online Chieftain cyber cell of Chadha, Solapur City Police provided cyber cell 2.73 lakhs | आॅनलाईन चोरांचा सायबर सेलकडून छडा, सोलापूर शहर पोलीसांच्या सायबर सेलने मिळवून दिले २.७३ लाख

आॅनलाईन चोरांचा सायबर सेलकडून छडा, सोलापूर शहर पोलीसांच्या सायबर सेलने मिळवून दिले २.७३ लाख

Next
ठळक मुद्देई-फसवणूक झाल्यास चोवीस तासांत पोलिसांच्या सायबर सेलकडे बँक स्टेटमेंटसह संपर्क साधामागील अकरा महिन्यांत सोलापूर शहर सायबर सेलकडे १०० तक्रारी अर्ज आले ४२ जणांची ११ लाख ३६ हजार ९२ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार होती

अमित सोमवंशी
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११  : आपल्या मोबालईवर अनोळखी नंबरवरुन फोन येतो. आपले एटीएम कार्डची माहिती विचारली जाते. अन्यथा आपले कार्ड बंद होईल असा इशारा दिला जातो. भीतीने आपण माहिती सांगतो अािण क्षणात आपल्या खात्यावरील पैसे वजा झाल्याचा संदेश येतो तेव्हा आपण अचानक घडलेल्या या प्रकाराने गोंधळून जातो. अशा वेळी पोलिसांच्या सायवर शाखेला त्वरीत कळवल्यास पैसे परत मिळवता येणे शक्य झाले असून पोलिसांनी आतापर्यंत २३ तक्रारींचा निपटारा करुन २.७३ लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. 
इंटरनेट किंवा मोबाईलवरून एटीएम कार्ड तसेच अन्य प्रकारची बँकेच्या संबंधातील आर्थिक ई-फसवणूक झाल्यास चोवीस तासांत पोलिसांच्या सायबर सेलकडे बँक स्टेटमेंटसह संपर्क साधा, तुमचे पैसे परत मिळतील. मागील अकरा महिन्यांत सोलापूर शहर सायबर सेलकडे १०० तक्रारी अर्ज आले आहेत़ त्यात ४२ जणांची ११ लाख ३६ हजार ९२ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार होती. यापैकी  २३ जणांनी बँक स्टेटमेंटसह चोवीस तासांत सायबर सेलकडे धाव घेतल्याने त्यांना पैसे मिळवून देणे सायबर सेलला सोपे झाले.  
‘आॅनलाईन’मुळे घरबसल्या व्यवहार करणे सोपे झाले; पण आॅनलाईन बँकिंग आणि खात्याची माहिती गुप्त ठेवण्याबाबत आजही अनेक ग्राहकांमध्ये जागरुकता नसल्याचे दिसून येते. सर्वच क्षेत्रांमध्ये आधुनिकतेचा वापर वाढल्यामुळे या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. आपल्याला कंपनीकडून एक कोटीचे बक्षीस लागले आहे, त्यासाठी तुम्हाला काही टक्के म्हणजे दोन किंवा चार लाख रुपये भरावे लागतील, असे संदेश येतात. पैशाच्या हव्यासापोटी अनेकांनी  लाखापर्यंत पैसे भरल्यानंतर फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही वेळा आपण बँकेचे मॅनेजर बोलतोय, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपली आहे, जुने कार्ड रद्द करुन तुम्हाला नवीन कार्ड दिले जाणार आहे. तुमचा सांकेतिक क्रमांक द्या, असे सांगून त्याद्वारे अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढले जातात. चोरट्यांकडून आधुनिक तंत्रांचा वापर करुन बँक खातेदारांना लक्ष्य करीत त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास करण्याचे प्रकार वाढत आहेत. 
------------------------
अनेकांना लाखोंचा गंडा
आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. सोलापूर शहरात १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान सोलापूर शहर सायबरकडे ४३ जणांनी तक्रार दाखल केली असून, त्यांची ११ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे अर्ज आहेत. याचा तपास सुरू असला तरी बहुतांशी गुन्ह्यांत ग्राहकांकडून भलत्याच व्यक्तीला ओटीपी, पिन नंबर दिल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. बँकेतून बोलतोय, एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, बँकेकडून पडताळणी सुरू आहे, पिन नंबर, ओटीपी नंबरची मागणी केली जाते. यास बहुतांशी ग्राहक फसतात. सर्व बँक डिटेल देतात. दोन दिवसांत या ग्राहकांच्या बँक खात्यातून आॅनलाईन रक्कम काढली जाते. शेअर करणे अशा २७ तक्रारी सायबर सेलकडे आल्या आहेत. अशा तक्रारी अर्जात अनेक नात्यांतील लोक असतात. अशा आरोपींना शोधण्यात सायबर सेलला १०० टक्के यश आले आहे.
------------------------
चोवीस तासांत असे    मिळतात पैसे 
एखाद्या नागरिकाची आॅनलाईन पैसे भरुन फसवणूक झाल्यास बँकेचे स्टेटमेंट सायबर सेलकडे घेऊन आल्यास ट्रान्झक्शन कुठे झाले, ते पैसे कुठल्या वॅलेटवर  जमा आहेत, संबंधित वॅलेटला सायबर सेलमार्फत मेल पाठविला जातो. त्यानंतर जर त्या वॅलेटवर पैसे शिल्लक असतील तर संबंधित तक्रारदाराच्या खात्यावर ते पैसे परत करण्यात येतात. त्यासाठी नागरिकांनी चोवीस तासांत सायबर सेलशी संपर्क करण्याची गरज आहे.
------------------
नागरिकांचे दुर्लक्ष.........
अनोळखी माणसांना आपल्या एटीएमचा नंबर देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी अनेकदा केले आहे.मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून लोक आपला नंबर अनोळखी लोकांकडे देत आहेत. कुठल्याही बँकेचा मॅनेजर फोनवरून एटीएम नंबर विचारत नाही. त्यामुळे अशा बोलण्याला नागरिक फसले नाहीत तर खात्यातून परस्पर पैसे काढण्यासारखे प्रकार होणारच नाहीत. पण  त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच असे प्रकार करणाºयांना रान मोकळे मिळते. याबाबत वारंवार बँकांकडून जागृती केली जाते. 
महिना    गहाळ व     सापडलेले 
     चोरी    मोबाईल
जानेवारी    ७०    ३४
फेब्रुवारी    ४०    २२
मार्च    ६०    २६
एप्रिल    ०४    ०१
मे    ३७    ०४
जून    २५    ०१
जुलै    ३०    ०३
आॅगस्ट    १६    ०१
सप्टेंबर    २९    ०२
आॅक्टोबर    १३    ०४
नोव्हेंबर    २४    १२
एकूण    ३४८    ११०

Web Title: Online Chieftain cyber cell of Chadha, Solapur City Police provided cyber cell 2.73 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.