आता मी विधानसभा लढविणारच नाही; संजय शिंदे यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:31 AM2019-03-30T10:31:54+5:302019-03-30T10:33:49+5:30

मी आता लोकसभा निवडणुकीत उभा राहिल्याने विधानसभा निवडणुकीत मी असणार नाही - संजय शिंदे

Now I will not contest the assembly elections; Sanjay Shinde's Explanation | आता मी विधानसभा लढविणारच नाही; संजय शिंदे यांची स्पष्टोक्ती

आता मी विधानसभा लढविणारच नाही; संजय शिंदे यांची स्पष्टोक्ती

Next
ठळक मुद्देशरद पवार जे कोण उमेदवार विधानसभा निवडणुकीत देतील, त्या उमेदवाराचा आपण प्रचार करू - संजय शिंदेविधानसभा निवडणुकीत मतदान न दिल्याने पाणी न देणाºया लोकप्रतिनिधींना आता मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्यानंतर जाब विचारावा - रश्मी बागल

करमाळा : मी आता लोकसभा निवडणुकीत उभा राहिल्याने विधानसभा निवडणुकीत मी असणार नाही. शरद पवार जे कोण उमेदवार विधानसभा निवडणुकीत देतील, त्या उमेदवाराचा आपण प्रचार करू, असे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.

करमाळ्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत मतदान न दिल्याने पाणी न देणाºया लोकप्रतिनिधींना आता मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्यानंतर जाब विचारावा, असे आवाहन रश्मी बागल यांनी केले.

राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे व रश्मी बागल यांनी कंदर, लव्हे, साडे, पांडे, कोर्टी व वीट येथे सभा घेतल्या. यावेळी विलासराव घुमरे, सुभाष गुळवे, चिंतामणी जगताप, बंडू ढवळे, राजेेंद्र बारकुंड, राजेंद्रसिंह राजेभोसले, अल्ताफ तांबोळी, दत्ता जाधव, सूर्यकांत पाटील, कन्हैय्यालाल देवी उपस्थित होते.

Web Title: Now I will not contest the assembly elections; Sanjay Shinde's Explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.