आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मोबाईल अ‍ॅपव्दारे होणार कलमापन चाचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 05:54 PM2018-10-10T17:54:40+5:302018-10-10T17:56:17+5:30

Now, the appellation test is done by the mobile app of Class X students | आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मोबाईल अ‍ॅपव्दारे होणार कलमापन चाचणी 

आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मोबाईल अ‍ॅपव्दारे होणार कलमापन चाचणी 

Next
ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड अकरा तालुक्यातील प्रत्येकी एका तंत्रस्नेही साठी प्रशिक्षण

सोलापूर : इयत्ता  दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.  याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी दिली.

श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ही कल मापन चाचणी घेण्यात येते. यावर्षी ही चाचणी महाकरियर मोबाईल अ‍ॅप द्वारे याचा निर्णय माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळाने घेतला आहे त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे त्यासाठी येत्या १२ व १३ आॅक्टोबर रोजी दहावीचा वर्ग शिकवणाºया अकरा तालुक्यातील प्रत्येकी एका तंत्रस्नेही साठी प्रशिक्षण आयोजित केले आहे.

महाराष्ट्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची अभिरूची आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात येते. यामुळे त्याच्या आवडीचे क्षेत्र आणि त्याची येते. याचा दहावीनंतरच्या करियर निवडीसाठी उपयोग होतो. यावर्षी ही चाचणी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही चाचणी १५ ते २० आॅक्टोबरच्या दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे.
---
अपेक्षित सामग्री 
तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी तंत्रस्नेही शिक्षक आंकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आवश्यक आहे. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणारी  कल मापन चाचणी ही प्रत्येक शाळेतून मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्यात येणार असल्याने संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा किंवा जबाबदार कर्मचाºयांचा मोबाईल नंबर तसेच शाळेचा यु डायस क्रमांक या महत्त्वाच्या अनुषंगिक बाबी आवश्यक आहेत. सातारा जिल्ह्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे कल चाचणी यशस्वी झाल्यानंतर राज्यभर सर्व जिल्ह्यात डिसेंबर-जानेवारीमध्ये अशी चाचणी घेण्याचा विचार होणार आहे. माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी पत्रान्वये ही माहिती दिली आहे.

Web Title: Now, the appellation test is done by the mobile app of Class X students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.