Narendra Modi's meeting on Thursday at Akluj | अकलूज येथे गुरूवारी नरेंद्र मोदींची सभा
अकलूज येथे गुरूवारी नरेंद्र मोदींची सभा

ठळक मुद्देया सभेसाठी ३० बाय ४० चे स्टेज बनविण्याचे काम सुरुशंकरराव मोहिते महाविद्यालय, बायपास रोड व स्टेज मागील जागेत हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार तब्बल ३४ वर्षांनंतर दुसºया पंतप्रधानांची एंट्री होणार

अकलूज : सध्याच्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जागा पूर्व-पश्चिम अशी केली आहे़ सभेचे स्टेज हे पश्चिम दिशेला केल्यामुळे नागरिकांचे तोंड पश्चिमेला होईल़ यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास कमी होणार आहे़ सभेची वेळ ही सकाळी असल्यामुळे भर उन्हाचा तडाखा नागरिकांना बसणार नाही. याचीही खबरदारी संयोजकांकडून घेण्यात येत असल्याचे दिसून येते.

१७ रोजी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकलूज येथे होत आहे़ सुमारे दोन लाख नागरिकांना बसता येईल, अशी तयारी संयोजकांकडून करण्यात आली आहे़ अकलूज येथे माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शंकरनगर-अकलूज रोडवरील क्रीडा संकुलासमोरील मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.

या सभेसाठी पूर्व-पश्चिम २५ एकर म्हणजेच एकूण सुमारे १० लाख ८९ हजार स्क्वे. फूट जागेचे निश्चितीकरण केले आहे. त्यापैकी पश्चिम बाजूला ५ एकर म्हणजेच सुमारे २ लाख १७ हजार ८०० स्क्वे. फूट जागा स्टेज, डी झोन व स्टेज मागे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी राखीव ठेवले आहे़ उर्वरित पश्चिमेला २० एकर म्हणजेच सुमारे ८ लाख ७१ हजार २०० स्क्वे. फूट जागेत प्रती व्यक्ती ५ स्क्वे.फूट प्रमाणे सुमारे १ लाख ७५ हजार नागरिकांच्या बैठकीची सोय करण्यात केली आहे़ आजूबाजूचे मिळून सुमारे २ लाखांपेक्षा अधिक नागरिक बसतील, असा मैदानाचा आकार आहे. शनिवारी केंद्र शासनाच्या सुरक्षा अधिकाºयांसमवेत व राज्य शासनाचे कोल्हापूर परिसर क्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके व इतर विभागाच्या प्रथम श्रेणीचे अधिकारी यांच्यात बैठक झाली़ शिवाय सभेच्या निमित्ताने कडक नियम व धोरणांची अंमलबजावणी करण्याचे ठरले   आहे.

दुसºयांदा पंतप्रधान
माळशिरस : तालुक्यात आणि अकलूज नगरीत तब्बल ३४ वर्षांनंतर दुसºया पंतप्रधानांची एंट्री होणार आहे़ यापूर्वी १९८५ साली तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी हे तेव्हाचे विधानसभेचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्या सभेला त्याकाळी यशही मिळाले होते आणि उमेदवारही विजयी झाला होता़ १९८५  साली काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती़ केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेसचीच सत्ता होती. यावेळी राजीव गांधीं यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती़ तेव्हा काँग्रेसचे उमेदवारी विजयसिंह मोहिते-पाटील हे विजयी झाले होते़ 

मोदींची सभा होणारच: देशमुख
- माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये येत्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कसल्याही स्थितीत होणार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले. १८ एप्रिल रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून, त्याआधीच एक दिवस मोदींची सभा अकलूजमध्ये होत आहे.१७ रोजी नरेंद्र मोदी यांच्या सभेला केंद्रीय निवडणूक आयोगानेच परवानगी दिली आहे. माढा लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होतोच कसा ? असा सवाल करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कसल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याचे स्पष्ट केले. या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

३० बाय ४० चे स्टेज
या सभेसाठी ३० बाय ४० चे स्टेज बनविण्याचे काम सुरु आहे. स्टेजसमोर ६० फुटापर्यत मोकळा डी झोऩ त्यानंतर दुसरा डी झोड ५५ फुटाचा आहे़ यामध्ये व्हीआयपी व्यक्तींसह पत्रकारासाठी बैठक व्यवस्था असेल़ स्टेज पासून २०० फुटाच्यापुढे नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. स्टेजच्या मागे अतिव्हीआयपी व्यक्तींच्या गाड्यांची पार्किंग करण्यात आली आहे़ शंकरराव मोहिते महाविद्यालय, बायपास रोड व स्टेज मागील जागेत हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्यात येत आहे.

अन्यथा आचारसंहितेचा भंग: कलशेट्टी
-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अकलूज येथे १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. माढा मतदारसंघाच्या लगतच असलेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी सभेच्या दुसºयाच दिवशी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे मोदी यांची ही जाहीर सभा आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी आहे. या सभेस आमची हरकत आहे असे लेखी पत्र नारायण सुरवसे, अ‍ॅड. नितीन कलशेट्टी व विलास लोकरे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे रविवारी दिले आहे.  मोदी यांच्या सभेस परवानगी देण्यात येणार असेल तर याबाबत उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल अशी माहिती अ‍ॅड. नितीन कलशेट्टी यांनी पत्रकारांना दिली. 


Web Title: Narendra Modi's meeting on Thursday at Akluj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.