ना मामुसे नकटा मामु सही; सोलापूर महापालिका कामगारांना १५०० रूपये बोनस जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 03:15 PM2018-11-05T15:15:31+5:302018-11-05T15:43:25+5:30

सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेतील कामगारांना दिवाळीसाठी १५०० रूपये बोनस आणि ४ हजार रूपये अ‍ॅडव्हान्स देण्याचा निर्णय ...

Na Maamusu Nakata Mammu Correct, 1500 rupees bonus to Solapur municipal workers | ना मामुसे नकटा मामु सही; सोलापूर महापालिका कामगारांना १५०० रूपये बोनस जाहीर

ना मामुसे नकटा मामु सही; सोलापूर महापालिका कामगारांना १५०० रूपये बोनस जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्दे- महापौर शोभा बनशेट्टी यांनी बोनस व अ‍ॅडव्हान्स देण्याचे केले जाहीर- सहकारमंत्री, पालकमंत्री यांची शिष्टाई- सोलापूर महापालिकेच्या पदाधिकाºयांच्या दबावामुळे झाला निर्णय

सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेतील कामगारांना दिवाळीसाठी १५०० रूपये बोनस आणि ४ हजार रूपये अ‍ॅडव्हान्स देण्याचा निर्णय महापौर शोभा बनशेट्टी यांनी सोमवारी जाहीर केला.

 महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने कारण सांगून सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिला होता. त्यामुळे कामगारांनी आंदोलन सुरू केले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्र्याकरवी आयुक्तांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता.  तरीही आयुक्त ढाकणे नमले नव्हते़ अखेर  दोन मंत्र्याची शिष्टाई, महापालिका पदाधिकाºयांचा दबावामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले़ त्यानुसार सोमवारी प्रशासनाने बोनस व अ‍ॅडव्हान्स देण्यावर राजी झाल्याने महापौर शोभा बनशेट्टी यांनी अ‍ॅडव्हान्स व बोनस देण्याचे जाहीर केले़.

मनपा कर्मचाºयाना १५०० रूपये व ४ हजार रूपये अ‍ॅडव्हान्स देण्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी जाहीर केले.  यावेळी कामगार नेते अशोक जानराव यांनी 'ना मामुसे नकटा मामुही सही', असे म्हणत मनपा पदाधिकारी आणि प्रशासनाने आभार मानले. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृहनेते संजय कोळी, महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील आदी उपस्थित होते़ 


 

Web Title: Na Maamusu Nakata Mammu Correct, 1500 rupees bonus to Solapur municipal workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.