खून करण्यापुर्वी चहातून दिल्या होत्या झोपेच्या दहा गोळ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:31 PM2019-06-25T12:31:23+5:302019-06-25T12:34:57+5:30

सोने अन् पैशासाठीच राजेशचा झाला खून; सहाय्यक पोलीस आयुक्तांची माहिती

Before the murder, there were 10 tablets of sleep from the tea ... | खून करण्यापुर्वी चहातून दिल्या होत्या झोपेच्या दहा गोळ्या...

खून करण्यापुर्वी चहातून दिल्या होत्या झोपेच्या दहा गोळ्या...

googlenewsNext
ठळक मुद्देअ‍ॅड. राजेश कांबळे यांचा खून दि. ८ जून २०१९ रोजी बंटी खरटमल याच्या पांडुरंग वस्ती येथील राहत्या घरी झालागुन्ह्याच्या दृष्टीने आणखीन पुरावा संकलित करावयाचा आहे. असेही न्यायालयात सांगण्यात आलेसंजय उर्फ बंटी खरटमल याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून अ‍ॅड. सुरेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले

सोलापूर : अ‍ॅड. राजेश कांबळे यांचा खून अंगावरील सोने व पैशासाठीच झाला आहे. आजवरच्या तपासात अन्य कोणतेही कारण पुढे आले नाही. वकील सुरेश चव्हाण हा तपासाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे आणखी चौकशी सुरू आहे अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त महावीर सकळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

अ‍ॅड. राजेश कांबळे यांचा खून दि. ८ जून २०१९ रोजी बंटी खरटमल याच्या पांडुरंग वस्ती येथील राहत्या घरी झाला. दि. १२ जून २०१९ रोजी हा खून उघडकीस आला. संजय उर्फ बंटी खरटमल याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून अ‍ॅड. सुरेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. सुरेश चव्हाण याला १५ जून २०१९ रोजी न्यायालयात उभे केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. 

कोठडीमध्ये बंटी खरटमल व सुरेश चव्हाण या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. आजवरच्या तपासात बंटी खरटमल याने अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या अंगावरील सोने व पैशासाठीच खून केल्याचे सांगत आहे. बंटीच्या जबाबावरून अटक करण्यात आलेला दुसरा संशयित आरोपी अ‍ॅड. सुरेश चव्हाण हादेखील पोलीस कोठडीत आहे. मात्र तो पोलिसांच्या चौकशीला प्रतिसाद देत नाही. याच प्रकरणात अटक असलेला सराफ श्रीनिवास येलदी याचीही चौकशी सुरू आहे. आजवरच्या कालावधीत सर्वांगाने तपास करण्यात आला आहे. पक्षकारावरून कोणता वाद होता का?, पैशाचा व्यवहार कोणता होता का ? किंवा अन्य कोणते कारण होते का ? याचा तपास घेण्यात आला. तपासातून काही निष्पन्न झाले नाही. सध्याच्या स्थितीला अ‍ॅड. राजेश कांबळे यांचा खून केवळ पैसे आणि दागिने याच्यासाठीच झाला असल्याचे दिसून येत आहे असे सहायक पोलीस आयुक्त महावीर सकळे यांनी सांगितले.         

सुरेश चव्हाण याला तीन दिवसांची पोलीस कोठडी
- आरोपी अ‍ॅड. सुरेश चव्हाण याला सोमवारी न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलाीस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा तपास शीघ्रगतीने करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के. अनभुले यांच्यासमोर सुरेश चव्हाण याला उभे करण्यात आले होते. न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत, मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. रजाक शेख तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. डी.जी. चिवरी यांनी काम पाहिले. 

चहातून दिल्या होत्या झोपेच्या दहा गोळ्या...
- खून करण्याच्या अगोदर बंटी खरटमल याने अ‍ॅड. राजेश कांबळे यांना आपल्या घरी नेले होते. तेथे त्याने चहा केला व कपात झोपेच्या १० गोळ्या टाकून तो पिण्यास दिला होता. झोपेच्या गोळ्या अ‍ॅड. सुरेश चव्हाण याने दिल्या होत्या, असे बंटी खरटमल याने सांगितले आहे. सुरेश चव्हाण याच्याकडे चौकशी केली असता त्याने गोळ्यांबाबत काही माहीत नसल्याचे सांगत आहे. खून करण्यासाठी सुरेश चव्हाण याने बंटी खरटमल याला वेळोवेळी मार्गदर्शन व मदत केली असल्याचेही बंटी याने सांगितले आहे. त्यामुळे याचा सखोल तपास होण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचाही युक्तिवाद फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला. 

आणखी पुरावे हवे आहेत
- सुरेश चव्हाण याने बंटी खरटमल याच्याबरोबर फोनवर बोलल्याचे सीडीआरवरून स्पष्ट झाले आहे, मात्र तो त्याचा मोबाईल काढून देत नाही. सुरेश चव्हाण याच्याकडे चौकशी करून मोबाईल हस्तगत करायचा आहे. सुरेश चव्हाण हा बंटी खरटमल याच्यासोबत फिरून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सामान खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याच्या दृष्टीने आणखीन पुरावा संकलित करावयाचा आहे. असेही न्यायालयात सांगण्यात आले.

Web Title: Before the murder, there were 10 tablets of sleep from the tea ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.