मनपाच्या गाळ्यांचे लिलाव होणार नाहीत, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती, सोलापूर शहराचे प्रश्न निकाली काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, February 09, 2018 1:25pm

मनपाच्या मालकीच्या गाळेभाडेवाढीचा प्रश्न येत्या आठवडाभरात मार्गी लावला जाईल, यात कोणत्याही गाळ्यांचे लिलाल न करता मध्यमार्ग काढला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि ९ : मनपाच्या मालकीच्या गाळेभाडेवाढीचा प्रश्न येत्या आठवडाभरात मार्गी लावला जाईल, यात कोणत्याही गाळ्यांचे लिलाल न करता मध्यमार्ग काढला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे बोलताना दिली.  मनपाच्या मुदत संपलेल्या मेजर व मिनी गाळ्याच्या भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. याबाबत सभागृहात दोनवेळा ठराव झाला. प्रशासनाने मुदत संपलेल्या गाळ्यांमधून चांगले उत्पन्न येण्यासाठी बाजारभावाप्रमाणे गाळ्यांचे दर निश्चित होण्यासाठी लिलाव पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला सभेत विरोध झाला. शासनाकडे पहिल्यांदा हा प्रस्ताव पाठविल्यावर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांनी अधिकारात हा निर्णय घ्यावा म्हणून परत पाठविला. त्यावर आयुक्तांनी ई निविदा पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव दिल्यावर पुन्हा विरोध झाल्याने पुन्हा हा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. यावर बोलताना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हा राज्यभराचा प्रश्न आहे. गाळ्यांच्या भाडेवाढीबाबत शासन एक सर्वंकष धोरण ठरवित आहे; मात्र यातील लिलाव पद्धत काढून टाकण्यात आली आहे.  यात जे सध्या मूळ व्यापारी आहेत, त्यांच्यावर अन्याय न होता भाडेवाढ कशी करायची हे ठरविले जाणार आहे. आठवडाभरात हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  आजच्या दौºयात डॉ. पाटील यांनी मनपा व नपासाठी असलेल्या शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतला.  पंतप्रधान व रमाई आवास योजनेतील अडचणी जाणून घेतल्या. यातील जाचक अटी काढून सर्व गरिबांना २0२२ पर्यंत घर मिळेल यावर भर दिला जाणार आहे. ही योजना राबविण्यासाठी काही क्रेडाईचे बिल्डर पुढे आले आहेत. त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. मनपाची सांडपाणी प्रक्रिया व तुळजापूर कचरा डेपोजवळील वीज निर्मिती प्रकल्पाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. ------------------------- अशोक लेलँडची चौकशी केंद्रीय योजनेतून मनपा परिवहनला पुरविण्यात आलेल्या ९९ जनबसच्या चेसीक्रॅक झाल्या. पण याबाबत अशोक लेलँड कंपनीने हात वर केल्याने परिवहनची स्थिती नाजूक झाल्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या निदर्शनाला आणून दिल्यावर त्यांनी अशोक लेलँडची चौकशी केली जाईल असा इशारा दिला. एकाचवेळी इतक्या बसची चेसीक्रॅक होते ही बाब गंभीर आहे. कंपनीचा डिफेक्ट असताना प्रश्न प्रलंबित ठेवणे बरोबर नाही. याबाबत योग्य ती माहिती घेऊन कारवाई करू असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. 

संबंधित

पुरोगामी विचारांच्या शशिकलांनी घालून दिला शिक्षणाचा धडा
सोलापूर लोकमततर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान, सेंटरवर भल्या पहाटे कापला केक
सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवर भारनियमन
गाजराची पुंगी !
गाजराची पुंगी !

सोलापूर कडून आणखी

सोलापूर लोकमततर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान, सेंटरवर भल्या पहाटे कापला केक
सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवर भारनियमन
गाजराची पुंगी !
सोलापूर शहर पोलिसांकडून हातभट्टी दारू जप्त, दोन आरोपी अटकेत
विना परवाना आंदोलन ; सोलापूरच्या महापौरांसह भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

आणखी वाचा