सोलापूर शहरातील बड्या थकबाकीदारांना महापालिका बजावणार नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:32 AM2019-01-11T11:32:25+5:302019-01-11T11:33:45+5:30

सोलापूर : महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुली मोहिमेला सुरुवात केली आहे. ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाºया मिळकतदारांना नोटिसा ...

Municipal corporation's municipal corporation to issue notice to Solapur | सोलापूर शहरातील बड्या थकबाकीदारांना महापालिका बजावणार नोटीस 

सोलापूर शहरातील बड्या थकबाकीदारांना महापालिका बजावणार नोटीस 

Next
ठळक मुद्दे५० हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाºया मिळकतदारांना नोटिसा बजाविण्यात येणारमहापालिका प्रशासनाने यंदा वसुलीसाठी कडक धोरण अवलंबिले१५ दिवसांत थकबाकी न भरल्यास वॉरंट बजावण्यात येईल

सोलापूर : महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुली मोहिमेला सुरुवात केली आहे. ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाºया मिळकतदारांना नोटिसा बजाविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी  दिली.


महापालिका मिळकत कराची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. प्रशासनाने मिळकतदारांना यापूर्वीच संगणकीकृत बिलांचे वाटप केले आहे. बिल मिळाल्यानंतर आठ दिवसांच्या आत कर भरणाºयांना पाच टक्के सवलत देण्यात आली होती. याचा लाभ घेणारेही अनेक मिळकतदार आहेत. अशा मिळकतदारांसाठी यंदा प्रथमच आॅनलाईन व विभागीय कार्यालय आणि बँकांमध्ये बिल स्वीकृत करण्याची सोय केली आहे. याचा चांगला फायदा प्रशासनाला झाला. तरीही अनेक मिळकतदार मार्चअखेर बिल भरू असा विचार करून लवकर बिल भरणे टाळतात. त्यामुळे त्यांची थकबाकी वाढत जाते. बरेच मिळकतदार नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. त्यांचीही बिले थकीत राहिली जातात. 

सध्या जीएसआय सर्वेक्षणाच्या आधारे मिळकतींच्या नोंदी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम करणाºया सायबर टेक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाची फेरपडताळणी शहर व हद्दवाढ कर संकलन कार्यालयातर्फे करण्यात आली आहे. जीएसआयचे सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याने जुन्याच पद्धतीच्या नोंदीवरुन मालमत्ता कराची बिले देण्यात आली आहेत. 

यानुसार वसुली घेण्यात येणार आहे. आॅनलाईन भरणा करणारांची यादी कर संकलन विभागाला देण्यात आली आहे. यामुळे आता थकबाकीदारांची यादी स्पष्ट झाली आहे. या यादीत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाºयांना नोटिसा देण्यात येणार असून त्यानंतर वसुलीसाठी घरोघरी जाण्याची भूमिका घेण्यात येणार आहे. 

वॉरंट व नोटीस फी लागू 
- थकबाकी वसूल होण्यासाठी यापूर्वी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी वॉरंट व नोटीस फी माफ करण्याची घोषणा केली होती. पण आता अशी कोणतीच सवलत मिळकतदारांना मिळणार नाही. त्यामुळे मिळकतदारांनी मार्चअखेरची वाट न पाहता तातडीने थकबाकी भरावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

५० हजारांहून अधिक रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. त्यांनी १५ दिवसांत थकबाकी न भरल्यास वॉरंट बजावण्यात येईल. महापालिका प्रशासनाने यंदा वसुलीसाठी कडक धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे वेळेवर मालमत्ता कर भरावाच लागेल. 
- त्र्यंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त, महापालिका. 

Web Title: Municipal corporation's municipal corporation to issue notice to Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.