सहकारमंत्र्यांच्या विरोधात सोलापूरात रास्ता रोको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:19 PM2017-08-07T14:19:40+5:302017-08-07T14:20:10+5:30

सोलापूर दि ७ : सहकार मंत्री सुभाष  देशमुख यांच्या लोकमंगल समुदायाच्या  भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्याने शेतकºयांच्या नावाने त्या शेतकºयास कोणतीच कल्पना नसताना ३ लाख रुपयांचे कर्ज युनियन बँक आॅफ इंडिया, कासारवाडी पुणे येथून पीक कर्ज घेतले. तसेच येळेगाव येथील शेतकरी कल्याणराव मेंडगुदले यांच्या नावाने १५ लाख रुपयांचे कर्ज कॅनरा बँक शाखा सोलापूर येथून उचलले आहे. या शेतकºयांनी पोलिसांत तक्रार करुनही कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष,संचालक यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही़ शिवाय सरकारने शेतकºयांना ज्या सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत,त्याचा गैरवापर कोणी करू नये यासाठी शेतकºयांनी सोमवार ७ आॅगस्ट रोजी सोलापूर - विजापूर रस्त्यावरील मंद्रुप येथे रास्ता रोको आंदोलन केले़ या आंदोलनाचे नेतृत्व आप्पाराव कोरे यांनी केले़ 

Movement against the Cooperatives to stop the Solapur route | सहकारमंत्र्यांच्या विरोधात सोलापूरात रास्ता रोको आंदोलन 

सहकारमंत्र्यांच्या विरोधात सोलापूरात रास्ता रोको आंदोलन 

Next

आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : सहकार मंत्री सुभाष  देशमुख यांच्या लोकमंगल समुदायाच्या  भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्याने शेतकºयांच्या नावाने त्या शेतकºयास कोणतीच कल्पना नसताना ३ लाख रुपयांचे कर्ज युनियन बँक आॅफ इंडिया, कासारवाडी पुणे येथून पीक कर्ज घेतले. तसेच येळेगाव येथील शेतकरी कल्याणराव मेंडगुदले यांच्या नावाने १५ लाख रुपयांचे कर्ज कॅनरा बँक शाखा सोलापूर येथून उचलले आहे. या शेतकºयांनी पोलिसांत तक्रार करुनही कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष,संचालक यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही़ शिवाय सरकारने शेतकºयांना ज्या सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत,त्याचा गैरवापर कोणी करू नये यासाठी शेतकºयांनी सोमवार ७ आॅगस्ट रोजी सोलापूर - विजापूर रस्त्यावरील मंद्रुप येथे रास्ता रोको आंदोलन केले़ या आंदोलनाचे नेतृत्व आप्पाराव कोरे यांनी केले़ 
दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेकडो शेतकºयांच्या नावाने युनियन बँक, कॅनरा बँक, इको बँक,शाखा सोलापूर व शाखा पुणे येथून परस्पर पीक कर्ज व वाहन कर्ज काढून शेतकºयांची फसवणूक केली़ तसेच सरकारचीही फार मोठी फसवणूक केली आहे. या झालेल्या गैरव्यवहाराची पुराव्यानिशी लेखी तक्रार मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे़ मात्र अद्याप यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे आंदोलन केले़ यावेळी विविध मान्यवर व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते़ 

Web Title: Movement against the Cooperatives to stop the Solapur route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.