'मोहिते-पाटलांनी भविष्यात हाफ चड्डी, टोपी घालून फिरू नये'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:15 AM2019-04-20T05:15:13+5:302019-04-20T05:15:42+5:30

सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोहिते-पाटलांना मागेल ते पद दिले.

'Mohite-Patels should not be allowed to wear half-legs, hats in the future' | 'मोहिते-पाटलांनी भविष्यात हाफ चड्डी, टोपी घालून फिरू नये'

'मोहिते-पाटलांनी भविष्यात हाफ चड्डी, टोपी घालून फिरू नये'

Next

नातेपुते (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोहिते-पाटलांना मागेल ते पद दिले. त्यांनी जो विकास केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रश्नासाठी त्यांनी भाजपचा घरोबा केला नसून त्यांच्या अनेक सहकारी व खाजगी संस्था अडचणीत असल्यामुळे त्यांचे स्थिरीकरण करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांनी भविष्यात हाफ चड्डी, टोपी घालून फिरू नये. हे मला अजिबात आवडणार नाही. सत्तेसाठी लाचार होऊ नका, असा टोलाही राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
नातेपुते (ता. माळशिरस) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढा मतदार संघाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी पवार यांची सभा झाली. पवार म्हणाले, देशातील सैन्यावर हल्ला झाला. त्यात अनेक भारतीय सैनिक मरण पावले. त्यावेळी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये प्रमुखाने मी या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्यात यावे, असा सल्ला दिला होता. २००४ साली अजित पवार यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला मंजुरी देऊन निधी दिला होता. परंतु या योजनेला भाजप आमदारांनी प्रखर विरोध केल्याने योजना रखडली.

Web Title: 'Mohite-Patels should not be allowed to wear half-legs, hats in the future'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.