मोहोळजवळ दुहेरी अपघात, तिघे जागीच ठार, पिकअपने टँकरसह मोटारसायकलस्वारास उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:15 PM2017-12-17T18:15:32+5:302017-12-17T18:17:35+5:30

उभ्या असलेल्या टँकरला जोराची धडक देऊन पुन्हा मोटारसायकलला धडक दिली़ या दुहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास मोहोळजवळील हिवरेपाटीजवळ घडली़

Mohal was killed in a double accident, three died on the spot and a pick-up trucker flew with a tanker | मोहोळजवळ दुहेरी अपघात, तिघे जागीच ठार, पिकअपने टँकरसह मोटारसायकलस्वारास उडविले

मोहोळजवळ दुहेरी अपघात, तिघे जागीच ठार, पिकअपने टँकरसह मोटारसायकलस्वारास उडविले

Next
ठळक मुद्देसोलापूर ते टेंभूर्णीकडे जाणाºया चौपदरीकरणाच्या दुरुस्तीचे काम सुरूवडवळ ते मोहोळ या पहिल्या टप्यात मागील दोन महिन्यात आठ जणांचे प्राण गेलेमोहोळ ते यावली या मार्गाचे काम सुरू असतानाच पाहिले तीन बळी गेले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
मोहोळ दि १८  : उभ्या असलेल्या टँकरला जोराची धडक देऊन पुन्हा मोटारसायकलला धडक दिली़ या दुहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास मोहोळजवळील हिवरेपाटीजवळ घडली़
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडनिंबकडून मोहोळकडे येणाºया एम.एच. १३ ए. एम.८४६८ या पिकअप चा चालक विठ्ठल विश्वनाथ बंडगार (वय ३७ रा. बाळे) याने बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने यावली गावाजवळ उभ्या असलेल्या टँकर क्र. एमएच १६ ए वाय ७७८१  या गाडीची डिझेल टाकी लिकेज झाल्याने ती दुरूस्त करण्यासाठी टाकीजवळ उभे असलेले मनोजकुमार यादव (वय ३०), राजकुमार यादव (वय २५ दोघे रा. जैनपूर उत्तर प्रदेश ) या दोघांना उडवून समोरून येणाºया मोटारसायकल क्र. एमएच१३ ए ,डब्लू ५८८१ वरील युवक गणेश दत्तु आखाडे (वय २५ रा. हिवरे ता. मोहोळ ) या तिघांना जोराची धडक दिल्याने हे तिघेही अपघातात ठार झाले. याबाबतची खबर स्वत: जीप चालक विठ्ठल बंडगर यांनी दिली असुन हयगयीने वाहन चालवून तीघांच्या मृत्यूला  जबाबदार असणाºया पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला़ याबाबतचा अधिक तपास पोहेकॉ अविनाश शिंदे हे करीत आहेत़
------------
सोलापूर ते टेंभूर्णीकडे जाणाºया चौपदरीकरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे़ त्यामुळे एकाच बाजूने वाहतुक सुरू आहे़ या कामाच्या वडवळ ते मोहोळ या पहिल्या टप्यात मागील दोन महिन्यात आठ जणांचे प्राण गेले आहेत तर दुसºया टप्यात मोहोळ ते यावली या मार्गाचे काम सुरू असतानाच पाहिले तीन बळी गेले आहेत़ यामुळे वाहनचालकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Mohal was killed in a double accident, three died on the spot and a pick-up trucker flew with a tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.