महाराष्ट्र बंद़़......सोलापूर शहर व जिल्ह्यात कुठे काय जाणून घ्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 11:33am

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि ३ : भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़ - सोलापूर शहर व जिल्ह्यातील सकाळच्या सत्रातील शाळा काही ठिकाणी चालू तर काही ठिकाणी बंद आहेत़ - सोलापूर-बार्शी रोडवर अकोलेकाटी फाट्याजवळ सोलापूर महानगरपालिकेची संतप्त जमावाने बस फोडली - विद्यार्थी वाहतुक संघटनांनी वाहनांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वत: आज वाहतुक बंद ठेवली - नवीपेठ, शिवाजी चौक, सात रस्ता, विजापूर वेस, टिळक चौक आदी बाजारपेठेतील दुकाने बंद़ - पोलीसांनी नवीपेठ, पाणीवेस, लक्ष्मी मार्केट आदी परिसरात रूट मार्च करून व्यापाºयांना दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले़ - पुना नाका, तुळजापूर नाका, हैद्राबाद नाका आदी नाक्यावर नाकाबंदी सुरू - पोलीसांचा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त - सोलापूर एसटी बसस्थानकात शुकशुकाट, प्रवासी अडकून पडले - सोलापूर महानगरपालिका परिवहनची बससेवा तुरळक प्रमाणात सुरू - बाजार समितीत व्यवहार सुरळीत, पालेभाज्याचे लिलाव सुरू - दत्त नगर येथे मोर्चासाठी जमणाºया माकपच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात - सकाळच्या सत्रात पंढरपूर बसस्थानकावरील एसटी बससेवा बंद होती - करमाळा, अक्कलकोट, बार्शी आदी तालुक्याचे ठिकाणी कडकडीत बंद - शहरातील शाळा, महाविद्यालयासमोर पोलीसांचा मोठा बंदोबस्त - छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुकाने बंद करा म्हणाºया दोघांना पोलीसांनी घेतले ताब्यात - निराळे वस्ती येथे पोलीसांची धरपकड सुरू, काही कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - तरटी नाका, बाळीवेस येथे तणावपूर्ण शांतता - कस्तुरबा मार्केट १०० टक्के बंद - टेंभुर्णी येथे वैद्यकीय सेवा वगळता १०० टक्के बंद -मोहोळ शहर कडकडीत बंद -मंगळवेढा बसस्थानकात शुकशुकाट - मोडनिंब शहरातील व्यवहार सुरळीत सुरू - सम्राट चौकात गोंधळ घालणाºया ३० कार्यकर्त्यांना पोलीसांनी केली अटक - सोलापूर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ - सोलापूर ग्रामीण भागात पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी सर्वच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ कर्मचाºयांना चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले - शांतता राखण्याचे शहर व जिल्हा पोलीस प्रमुखांचे आवाहन -

संबंधित

मी कात टाकली..बदलत्या वस्तींची कहाणी; सोलापुरातील मल्लांसह वकील, डॉक्टर अन् राजकारणीही घडले !
सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीतून नरेंद्र मोदी सभेसाठी झाला ९४ लाखांचा खर्च
फेब्रुवारीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत
दुष्काळ पाण्याचा का नियोजनाचा ?
समाजात बंधुता अत्यंत आवश्यक...!

सोलापूर कडून आणखी

मी कात टाकली..बदलत्या वस्तींची कहाणी; सोलापुरातील मल्लांसह वकील, डॉक्टर अन् राजकारणीही घडले !
सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीतून नरेंद्र मोदी सभेसाठी झाला ९४ लाखांचा खर्च
फेब्रुवारीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत
दुष्काळ पाण्याचा का नियोजनाचा ?
समाजात बंधुता अत्यंत आवश्यक...!

आणखी वाचा