मिरज-सोलापूर रेल्वेमध्ये माथेफिरूचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:15 PM2019-06-06T13:15:40+5:302019-06-06T13:18:52+5:30

मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष; ४५ मिनिटे प्रवाशांचा जीव टांगणीला

Mafiru's mess in Miraj-Solapur Railway | मिरज-सोलापूर रेल्वेमध्ये माथेफिरूचा गोंधळ

मिरज-सोलापूर रेल्वेमध्ये माथेफिरूचा गोंधळ

googlenewsNext
ठळक मुद्देमोडनिंब रेल्वे स्टेशनदरम्यान मिरज-सोलापूर गाडीत रेल्वे इंजिनमध्ये घुसून माथेफिरूने नंगानाच केलाया अनपेक्षित प्रकारामुळे रेल्वेतील हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला लागलाया हजारो प्रवाशांच्या देखत हा प्रकार सुरू असताना अन् रेल्वे प्रशासनातील जबाबदार मंडळींना याची खबर देऊनही दक्षता घेतली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे

सोलापूर : मोडनिंब रेल्वे स्टेशनदरम्यान मिरज-सोलापूर गाडीत रेल्वे इंजिनमध्ये घुसून माथेफिरूने नंगानाच केला. या अनपेक्षित प्रकारामुळे रेल्वेतील हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. या हजारो प्रवाशांच्या देखत हा प्रकार सुरू असताना अन् रेल्वे प्रशासनातील जबाबदार मंडळींना याची खबर देऊनही दक्षता घेतली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिरज-सोलापूर रेल्वे गाडी (गाडी नंबर २२१५६) पंढरपूर रेल्वे स्टेशनवर बुधवारी सायंकाळी सहा पंचवीसला आल्यानंतर एका माथेफिरूने बेकायदेशीरपणे इंजिन ाध्ये प्रवेश केला. गाडीतील दोन्ही ड्रायव्हरने त्यास आत येऊ कसा दिला, हेही कुणास कळले नाही. नंतर दोन्ही ड्रायव्हरनी त्यास हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण तो बाहेर यावयास तयार नव्हता. त्यामुळे हजारो प्रवाशांसह सर्वांची पाचावर धारण बसली. या दरम्यान १५ मिनिटे गाडी उशिरापर्यंत थांबली. या माथेफिरूला ड्रायव्हरने खाली उतर म्हणून अनेक वेळा सांगितले, परंतु तो उतरण्यास तयार नव्हता.

शेवटी पंधरा मिनिटांनंतर पंढरपूर रेल्वे स्टेशनवरील आॅनड्यूटीवर असलेल्या आरपीएफ जवानास बोलावण्यात आले. त्यांनी सदर माथेफिरूने आरपीएफला दमदाटी करून अर्वाच्य भाषा वापरली. त्यानंतर त्याला कसेबसे खाली उतरविण्यात आले. परंतु आरपीएफने त्यास ताब्यात न घेता त्यास रेल्वे ब्रेकमध्ये बसवले आणि एकदाची पुन्हा गाडी सुरू झाली. मात्र यानंतरही त्या माथेफिरूचा गोंधळ आणि शिवीगाळ चालूच होती. चालत्या गाडीतच रेल्वेच्या पायरीवर त्याने उड्या मारल्या. दहा मिनिटांनंतर बाभूळगाव पास झाल्यावर चालत्या गाडीतून पुन्हा त्या माथेफिरूने इंजिनमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, गाडीतील शेकडो प्रवासी हे दृश्य पाहत होते, तर काही जण फोटो, व्हिडिओही काढत होते. पंढरपूर रेल्वे स्टेशनवरच या माथेफिरूची आरपीएफ, ड्रायव्हर स्टेशन मास्तरने का दखल घेतली नाही, याबद्दल प्रवाशांमधून उलट-सुलट चर्चा सुरू होती. काही प्रवाशांनी याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. 

 पंढरपूर-मोडनिंबदरम्यान मोडनिंब स्टेशन येण्याच्या अगोदर पाच मिनिटे सदर माथेफिरूने इंजिनमधून एक मोबाईलही हस्तगत केला. मोडनिंब स्टेशन आल्यावर अनेक प्रवासी इंजिनजवळ जमा झाले व इंजिनमधून पुन्हा त्या माथेफिरुस ड्रायव्हरने उतरविण्याचा प्रयत्न केला. पण तो उतरण्यास तयार नसल्याने ड्रायव्हरने त्यास गाडीतून ओढून धक्के व लाथा घालून बेकायदेशीरपणे कायदा हातात घेऊन हाकलून दिले.

मोडनिंब स्टेशनवरील स्टेशन मास्तर व पोर्टलला अनेक प्रवाशांनी ओरडून ही गोष्ट सांगितली. परंतु त्यांनीही कुठली दखल घेतली नाही. याबाबत रेल्वे प्रवाशांच्या वतीने गाडीत प्रवास करत असलेले ज्येष्ठ पत्रकार व सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष अरुण कोरे यांनी रेल्वेच्या इमर्जन्सी १८२ नंबरवर दूरध्वनीद्वारे तक्रार दिली. त्यानंतर कुर्डूवाडी आरपीएफ कार्यालयात दूरध्वनीद्वारे लँडलाईनला तक्रार  दिली. परंतु नेहमीप्रमाणे आरपीएफ खात्याने सदरहू तक्रार तुम्ही रेल्वे पोलीस खात्याकडे द्या, आमचा काही संबंध नाही, असे सांगून हात वर केले.

रात्री उशिरा रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता रेल्वे ड्रायव्हर्स, आरपीएफ, पंढरपूर, मोडनिंब स्टेशन मास्तर आदींनी या घटनेचे मेसेजेस वरिष्ठांना व कंट्रोल रूमला का दिले नाहीत, याबाबतही वरिष्ठांकडूनच दूरध्वनीद्वारे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रवासी वेठीस...
- रेल्वेच्या व आरपीएफच्या बेजबाबदार कर्मचाºयांमुळे हजारो रेल्वे प्रवाशांना पंढरपूर ते मोडनिंब यादरम्यान ४५ मिनिटे जीव मुठीत धरून प्रवास करावयास लावणाºया या घटनेबाबत रेल्वे प्रशासन, आर.पी.एफ., ड्रायव्हर्स, स्टेशन मास्तर व जबाबदार संबंधित कर्मचारी यांच्यावर योग्य ती दखल घेऊन कायदेशीर कारवाई करणार का, याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Mafiru's mess in Miraj-Solapur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.