जीवनात शिक्षणाबरोबर विद्या आणि कलागुणांचा समन्वय आवश्यक, अभिनेता अमेय वाघ याचे मत,  बीएमआयटीमध्ये अभिव्यक्त २०१८ चे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:17 PM2018-01-24T12:17:51+5:302018-01-24T12:23:39+5:30

विद्या आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबर कलाही महत्त्वाची आहे, मात्र चांगले आयुष्य जगण्यासाठी या दोन्हींचा समन्वय आपण ठेवायला हवा, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ याने व्यक्त केले.

In the life, education and art skills need coordination, actor Amey Wagh's opinion, BMIM inaugurated in 2018 | जीवनात शिक्षणाबरोबर विद्या आणि कलागुणांचा समन्वय आवश्यक, अभिनेता अमेय वाघ याचे मत,  बीएमआयटीमध्ये अभिव्यक्त २०१८ चे थाटात उद्घाटन

जीवनात शिक्षणाबरोबर विद्या आणि कलागुणांचा समन्वय आवश्यक, अभिनेता अमेय वाघ याचे मत,  बीएमआयटीमध्ये अभिव्यक्त २०१८ चे थाटात उद्घाटन

Next
ठळक मुद्देजीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि संघर्ष महत्त्वाचा - दिलीप माने विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबर कलाही महत्त्वाची - अमेय वाघबीएमआयटी कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिव्यक्त २०१८’ या अभिनव कार्यक्रम


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ :  विद्या आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबर कलाही महत्त्वाची आहे, मात्र चांगले आयुष्य जगण्यासाठी या दोन्हींचा समन्वय आपण ठेवायला हवा, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ याने व्यक्त केले. 
बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील बीएमआयटी कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिव्यक्त २०१८’ या अभिनव कार्यक्रमाचे उद्घाटन अमेय वाघ याच्या हस्ते झाले. यावेळी तो बोलत होता. आयएमएसचे अमोल जोशी, संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने, उपाध्यक्ष पृथ्वीराज माने, संचालिका जयश्री माने, उद्योजक केतन शहा,बीएमआयटीचे प्रभारी प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, बीएमपीचे प्राचार्य डॉ. श्रीकांत जोशी, एसपीएमच्या प्राचार्य प्रा. रोहिणी चव्हाण, बीएमजेसीच्या प्राचार्या प्रा. प्रतिभा माने आदी मंचावर उपस्थित होते. 
अमेय म्हणाला, मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असल्याने वर्गाबाहेर जास्त असायचो. मी माझ्या कलागुणांना वाव दिला. यातून मी नाट्यकला आणि चित्रपट क्षेत्रात आलो. उद्या जाऊन आयटी क्षेत्रातील मुले ऐटीत जगतील. पण कॉलेज जीवनात इतर कलागुणही आपण जपायला हवेत. पुढे जाऊन चांगले आयुष्य जगण्यासाठी या दोन्ही गोष्टी आयुष्याचा बॅलन्स ठेवायला मदत करतील. पुढील काळात बीएमआयटीमध्ये एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरणही होईल, असा आशावादही त्याने व्यक्त केला. 
या उपक्रमासाठी बीएमआयटीचे संचालक प्रा. राहुल माने, प्रा. अश्विनकुमार भोपळे, प्रा. एम.सी. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. जतीन पाटील, प्रा. विशाल बगले, प्रा. अतुल कांबळे, प्रा. सुवर्णा भरगंडे, प्रा. स्वानंद नागणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सायली झालटे, सलोनी चवरे यांनी केले. 
----------------------
कष्ट आणि संघर्ष महत्त्वाचा
दिलीप माने म्हणाले, अमेयचे कष्ट आणि संघर्ष पाहून तो उद्याचा सुपरस्टार असेल याची खात्री आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि संघर्ष महत्त्वाचा आहे. बीएमआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुण विकासासाठी आणखी कार्यक्रम होतील, असे आश्वासन त्यांनी दिले. 

Web Title: In the life, education and art skills need coordination, actor Amey Wagh's opinion, BMIM inaugurated in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.