लाखो रुपये खर्चून आणलेले पाणी टँकरमधून सांडते रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 12:33 PM2019-05-02T12:33:25+5:302019-05-02T12:34:57+5:30

सोलापूर महापालिकेची अशी बेपर्वाई; लिटरचा हिशोब अन् निम्मेच पाणी मिळते नागरिकांना

Lakhs of rupees spent on water from tankers | लाखो रुपये खर्चून आणलेले पाणी टँकरमधून सांडते रस्त्यावर

लाखो रुपये खर्चून आणलेले पाणी टँकरमधून सांडते रस्त्यावर

Next
ठळक मुद्देशहरातील नागरिकांना पाणी पुरविण्यासाठी खाजगी टँकर पुरवठादाराबरोबर महापालिकेने करार केलेला आहेपाच हजार लिटरच्या टँकरला ३00 तर दहा हजार लिटरच्या टँकरला प्रति खेप ५१६ रुपये भाडे दिले जात आहे

सोलापूर : शहरात होणारा चार दिवसाआड पाणी पुरवठा आणि हद्दवाढ भागात जाणविणारी पाणी टंचाई. यावरून महापालिका नागरिकांना सतत पाण्यचा जपून वापर करण्याचा सल्ला देत असते, पण दिव्याखाली अंधार या म्हणीप्रमाणे महापालिकेच्या टँकरमधून होणाºया गळतीकडे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

सध्या पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. हद्दवाढ भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. हद्दवाढ भागाबरोबरच शहरी भागालाही पाण्याची गरज भासू लागल्याने टँकरची मागणी वाढली आहे. नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिकेचे सहा व कंत्राटदाराचे १५ अशा २१ टँकरमधून पाणी पुरवठा होत आहे. 

टंचाईतील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी जुळे सोलापूर पाण्याची टाकी, साधू वासवानी पंप हाऊस आणि भवानीपेठ पाणी गिरणी यात तीन ठिकाणी टँकर भरण्याची सोय करण्यात आली आहे. 

टँकर भरल्यावर रस्त्याने जाताना निम्मे पाणी रस्त्यावर सांडले जात आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. टँकरमधील गळती पाहता निम्मे पाणीच नागरिकांपर्यंत पोहोचते ही वस्तुस्थिती समोर येत आहे. 

अशी होते गळती
- टँकरमधून पुढीलप्रमाणे पाणी गळती होत असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले आहे. पाणी भरण्याच्या ठिकाणी टँकरला झाकण नाहीत. त्यामुळे चढ, उतार, वाहन आडवे आल्यावर ब्रेक मारणे व गतीरोधकावरून टँकर जात असता टाकीतील पाणी ढवळून बाहेर उसळते. यामुळे रस्तावरून जाणाºया नागरिकांना आंघोळ करण्याचे प्रसंग घडले आहेत.  टँकरच्या टाक्यांना असणारी छिद्रे. जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीजवळ पाणी भरून टँकर प्रवेशद्वारतून बाहेर पडतानाच रस्त्याच्या रचनेमुळे ढवळून निम्मा टँकर रिकामा होतो. पाणी रस्त्यावर दुर्तफा वाहत जात आहे. यामुळे विशेष योजनेतून तयार केलेला चांगल रस्ता खराब झाला आहे. 

काय आहे करार
- शहरातील नागरिकांना पाणी पुरविण्यासाठी खाजगी टँकर पुरवठादाराबरोबर महापालिकेने करार केलेला आहे. पाच हजार लिटरच्या टँकरला ३00 तर दहा हजार लिटरच्या टँकरला प्रति खेप ५१६ रुपये भाडे दिले जात आहे. लिटरचा हिशोब केल्यास टाकीतून पाणी भरून निघालेला टँकर हद्धवाढीत पोहोचेपर्यंत त्यात किती पाणी असते याचा हिशोब कोणी पाहत नाही.

२0 टक्के गळती मान्य
- शहर पाणी पुरवठा वितरणातील उप अभियंता सिद्धेश्वर उस्तुरगे म्हणाले की, नियमानुसार २0 टक्के प्रवासातील गळती मान्य करावी लागणार आहे. टँकरची टाकी गळणे, झाकण नसणे, पाईप लिकेज तपासले जातील. महसूल प्रशासनाने शहराशेजारील गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. हे टँकर सोलापुरात भरले जातात. या टँकरची क्षमता पाहिली थेंब पाणी गळत नाही. उलट ग्रामीण भागातील खडतर रस्त्यावर हे टँकर प्रवास करतात. मग ही स्थिती महापालिकेच्या टँकरला का नाही असा सवाल उपस्थित होत आहे. अधिक चौकशी करता महापालिकेकडे नवीन ठेकेदार येतच नाहीत. बिल वेळेत मिळत नाही हे कारण सांगितले जात आहे. वर्षानुवर्षे तेच ठेकेदार काम करीत आहेत. 

Web Title: Lakhs of rupees spent on water from tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.