राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाकडून सांगावा मिळताच किशोर देशपांडे भाजपाच्या प्रचारात सक्रिय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:40 AM2019-03-25T10:40:26+5:302019-03-25T10:42:53+5:30

भाजपाचे जुने-जाणते निवडणूक  प्रमुख किशोर देशपांडे रविवारपासून पुन्हा भाजपाच्या प्रचारात सक्रिय.

Kishore Deshpande is active in campaigning for BJP after getting the reply from Rashtriya Swayamsevak Sangh | राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाकडून सांगावा मिळताच किशोर देशपांडे भाजपाच्या प्रचारात सक्रिय !

राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाकडून सांगावा मिळताच किशोर देशपांडे भाजपाच्या प्रचारात सक्रिय !

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले भाजपाचे जुने-जाणते निवडणूक  प्रमुख किशोर देशपांडे रविवारपासून पुन्हा भाजपाच्या प्रचारात सक्रियराष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठाच्या सांगाव्यानंतर आणि काही नगरसेवकाच्या आग्रहानंतर किशोर देशपांडे यांचे पुनरागमन झाल्याची चर्चा

राकेश कदम 

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले भाजपाचे जुने-जाणते निवडणूक  प्रमुख किशोर देशपांडे रविवारपासून पुन्हा भाजपाच्या प्रचारात सक्रिय झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठाच्या सांगाव्यानंतर आणि काही नगरसेवकाच्या आग्रहानंतर किशोर देशपांडे यांचे पुनरागमन झाल्याची चर्चा दिवसभर भाजपा वर्तुळातून ऐकायला मिळाली. 

भाजपाच्या कार्यकर्त्यांची पूर्वतयारीची बैठक रविवारी शांतीसागर मंगल कार्यालयात झाली. या बैठकीला प्रमुख नेत्यांसोबत किशोर देशपांडे उपस्थित होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्यांच्यात खटके उडाले होते. त्याची जगजाहीर चर्चाही झाली. त्यानंतर देशपांडे यांचे इतर काही नगरसेवकांशी बिनसले. त्यातून देशपांडे पक्षसंघटनेपासून बाजूला झाल्याचे भाजपाचे कार्यकर्ते सांगायचे. निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर ही बाब संघ परिवारातील सदस्य आणि माजी नगरसेवकांच्या लक्षात  आली. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नगरसेवकांनी संघ परिवारातील मंडळींच्या कानावर ही बाब घातली. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपात प्रवेश देतोय. पण आपलाच संघटक पक्षापासून दूर आहे. ही कुजबूज वाढल्यानंतर पक्षाकडून विचारणा झाली. अखेर देशपांडे यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

मी अनेक दिवस पक्षाच्या कामांपासून दूर होतो, हे खरे आहे. मी १९८० पासून सोलापूर  लोकसभा मतदारसंघात भाजपाचा निवडणूकप्रमुख म्हणून काम पाहतोय. त्यानंतर अगदी २०१४ पर्यंत मी पाहिले. आमच्यासाठी सुभाष देशमुख यांची २००४ मध्ये झालेली निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीच्या व्यवस्थापनात जरा जास्त कष्ट घ्यावे लागले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी निरोप दिल्याने मी पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला. 
- किशोर देशपांडे, निवडणूक प्रमुख, भाजपा

Web Title: Kishore Deshpande is active in campaigning for BJP after getting the reply from Rashtriya Swayamsevak Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.