साखरेचे दर पाडणे हे कारस्थानच, खा़ राजू शेट्टी यांचे मत, सोलापूरातील आक्रोश मेळाव्यात केले मोदी सरकारवर घणाघाती आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:56 PM2018-02-17T12:56:54+5:302018-02-17T12:59:29+5:30

मागील वर्षीची साखर शिल्लक नसताना यावर्षीसाठी आवश्यक साखरेचे उत्पादन होणार असल्याने ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा अंदाज असताना एकदम साखरेचे दर पाडणे हे कारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला.

Khwaja Raju Shetty's opinion, made in Aakrosh rally in Solapur: False allegations against Modi government | साखरेचे दर पाडणे हे कारस्थानच, खा़ राजू शेट्टी यांचे मत, सोलापूरातील आक्रोश मेळाव्यात केले मोदी सरकारवर घणाघाती आरोप

साखरेचे दर पाडणे हे कारस्थानच, खा़ राजू शेट्टी यांचे मत, सोलापूरातील आक्रोश मेळाव्यात केले मोदी सरकारवर घणाघाती आरोप

Next
ठळक मुद्देसाखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून उसाची पहिली उचल कमी करण्याला विरोध करण्यासाठी पुन्हा साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला कर्जमाफीतही शासनाने घोळ घातला असून सहकारमंत्री एक आकडा सांगतात तर मुख्यमंत्री चार हजार कोटींचे कर्जमाफ झाल्याचे सांगतात : खासदार राजू शेट्टीसोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही लढणारच आहोत असे रविकांत तुपकर यांनी सांगितले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : मागील वर्षीची साखर शिल्लक नसताना यावर्षीसाठी आवश्यक साखरेचे उत्पादन होणार असल्याने ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा अंदाज असताना एकदम साखरेचे दर पाडणे हे कारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला.
 सोलापूर जिल्हा शेतकरी संघटना कार्यकर्त्यांच्या आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून उसाची पहिली उचल कमी करण्याला विरोध करण्यासाठी पुन्हा साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. आम्ही तर आंदोलन करत आहोतच तुम्ही शेतकºयांनीही कारखानदारांना जाब विचारला पाहिजे असे खा. शेट्टी म्हणाले. कर्जमाफीतही शासनाने घोळ घातला असून सहकारमंत्री एक आकडा सांगतात तर मुख्यमंत्री चार हजार कोटींचे कर्जमाफ झाल्याचे सांगतात. प्रत्यक्षात एकही शेतकरी कर्जमाफ झाल्याचे सांगत नाही असे शेट्टी म्हणाले. 
शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एफ.आर.पी. अधिक ४०० रुपये देण्याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले होते, आम्ही आंदोलन थांबविलेले नाही, पुन्हा ऊसदरासाठी कारखाने बंद पाडू असा इशारा दिला. फसवणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींना हार्दिक पटेलने गुजरातमध्ये घाम आणला होता, सहकार मंत्री देशमुख यांना शेतकºयांचा पोरगा घाम आणल्याशिवाय राहणार नाही असे  तुपकर म्हणाले. जाफरताज पटेल यांनी ७० वर्षांत जे-जे निवडून गेले त्यांनी शेतकºयांवर अन्यायच केला, साखर कारखान्याचे वजनकाटे आॅनलाईन केले नाहीत, सर्वच पक्षाचे कारखानदार पैसे कमविण्यासाठी एकत्र आले, शेतकºयांना भाव मिळावा यासाठी लढले का?, असा सवाल विचारला.  स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल  यांनी कारखान्याचे वजनकाटे तपासणी पथक मॅनेज असल्याचा आरोप केला. साखर कारखान्याचा साखर उतारा अधिक असताना ९ टक्क्यांपर्यंत दाखवून दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला, यावेळी रणजित बागल यांचेही भाषण झाले. मेळाव्याला जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जालिंदर पाटील, अमोल हिप्परगे, उमाशंकर पाटील, नवनाथ माने, शिवाजी पाटील, सिद्रामप्पा अब्दुलपूरकर, सचिन पाटील, तानाजी बागल, बबलू गायकवाड, पोपट साठे, वसंत गायकवाड, अनिल पवार आदींसह महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. मंत्रालयात मृत्युमुखी पडलेल्या धर्मा पाटील यांना श्रद्धांजली तर वसंतराव आपटे यांना अभिवादन करण्यात आले. 
--------------------
खासदार राजू शेट्टी म्हणाले...
- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पटेल यांनी साखर विक्री व्यवहारावर लक्ष ठेवा असे सांगितले होते.
- काँग्रेस-राष्टÑवादीच्या साखर कारखानदारांना  आंदोलन व्हावे असे वाटते कारण सरकारची बदनामी होतेय.
- साखर खरेदीदारांच्या मागे का चौकशी लावत नाही?
च्साखर व्यवहाराबाबत शासनाच्या भूमिकेबाबतही संशय
- हरभरा व तूर विक्री करण्याची घाई शेतकºयांनी करू नये हमीभाव केंद्रावर संपूर्ण विक्री होईल.
-------------------------
बाजार समितीत संघटना मुसंडी मारेल
- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही लढणारच आहोत असे रविकांत तुपकर यांनी सांगितले होते, खासदार शेट्टी यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत मुसंडी मारेल असे सांगितले. 

Web Title: Khwaja Raju Shetty's opinion, made in Aakrosh rally in Solapur: False allegations against Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.