बार्शी तालुक्यातील ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:13 PM2018-07-12T14:13:12+5:302018-07-12T14:23:54+5:30

मूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटली; तुरीचे क्षेत्र टिकून

Kharipa sown area of ​​39 thousand 758 hectares of area in Barshi taluka | बार्शी तालुक्यातील ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

बार्शी तालुक्यातील ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

Next
ठळक मुद्देमृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरीमूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटलीपावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र सरासरी एवढा पाऊस

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी:  तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे व पुढेही पाऊस पडेल या आशेने तालुक्यातील शेतकºयांनी ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रांवर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. मूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटली असून, तुरीचे क्षेत्र मात्र टिकून आहे. 

तालुका हा रब्बीचा तालुका असला तरी तालुक्यात खरिपाचे उत्पन्नदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून खरिपाचे क्षेत्र वाढत आहे़ पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र सरासरी एवढा पाऊस पडला़  त्यामुळे खरिपाची पेर मोठ्या प्रमाणात झाली आहे. काही भागात अद्यापही तुरीची पेरणी होताना दिसत आहे़ आजअखेर तालुक्यात सरासरी १२६़१८  मि़ मी़ एवढा पाऊस पडला आहे़ 
 खरीप हंगामात तुरीच्या सरासरी १२,९३१ हेक्टर क्षेत्रापैकी ११००५(८५ टक्के) म्हणजे सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे़. तर मुगाचे क्षेत्र १६३  वरुन २२१३ (१३५८ टक्के )  हेक्टरवर गेले आहे तर उडदाच्या पेरणीमध्ये देखील वाढ होऊन १,८९२ हे़ वरुन ७४५५हे़(३४२ टक्के) एवढे वाढले आहे़

गेल्या काही वर्षांपासून पैसे मिळवून देणारे पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीन व उडदाचे पीक काढून रब्बीची ज्वारी घेता येत असल्याने या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली होती; मात्र मागील वर्षी उडीद व तुरीला दर कमी मिळाल्यामुळे यंदा या दोन्ही पिकासह मुगाची पेरणी ही कमी झाली आहे़ सोयाबीनचे क्षेत्रही यंदा घटले आहे़ 

यंदा पेरणी झालेले व मागील वर्षीचे तुलनात्मक क्षेत्र
- तूर -११००५-१४१९९ , मूग १६३- ३०३१ , उडीद  ६४७५- १३९९८, भुईमूग ४१-१४९ , सोयाबीन १९०२८-३३२८७ , कापूस १७३-१५० , मका ७३९-१०५३ , कडवळ,खरीप मक्यासह एकूण चारापिके ८९९- ९०६ हेग़ाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस ६५५५ हे़नवीन लागवड यंदा झाली नाही़  ३३८९ हे़ वर विविध प्रकारची फळपिके आहेत़ सर्व पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने सुरू आहे़ असाच अधूनमधून पाऊस पडत गेल्यास पिके चांगल्या पद्धतीने वाढतील असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

यंदा नवीन उसाची लागवड नाही
- गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये एक एकर देखील नवीन उसाची लागवड झालेली नव्हती; मात्र मागील दोन वर्षांत दमदार पाऊस पडल्यामुळे तालुक्यात ऊस लागवड झाली होती़ मागील वर्षीचाच  तालुक्यातील ६५५५ हेक्टरवरील ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध होणार आहे अत्यल्प क्षेत्रावर कांद्याची रोपे टाकलेली आहेत़ त्यामुळे किती क्षेत्रावर कांदा लागवड होणार हे अद्याप समजू शकले नाही़ 

Web Title: Kharipa sown area of ​​39 thousand 758 hectares of area in Barshi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.