ती आमच्या घरची ‘लक्ष्मी’ हाय, आता विकणार न्हाय बघा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:32 PM2018-12-08T12:32:41+5:302018-12-08T12:35:32+5:30

पोरीसारखं सांभाळलं : पंढरीच्या कार्तिकी बाजारात बघ्यांची गर्दी; नऊ लाखांना मागितली तरी म्हैस नाही दिली...

It's our house's 'Lakshmi', watch now! | ती आमच्या घरची ‘लक्ष्मी’ हाय, आता विकणार न्हाय बघा!

ती आमच्या घरची ‘लक्ष्मी’ हाय, आता विकणार न्हाय बघा!

googlenewsNext
ठळक मुद्देसहा वर्षांपूर्वी ते लहान रेडकू (मादी) ४ हजार ५०० रुपयाला इकत आणलंतळाहातावरच्या फोडाप्रमाणं तिचा सांभाळ केला़ आम्ही बोललेलं तिला सगळं कळतंय़ रागावलो तर शांत उभी राहतेय

प्रभू पुजारी 
पंढरपूर : सहा वर्षांपूर्वी लहान असताना तिला खांद्यावरून आणलंय, पोरीवानी सांभाळलंय़ तिचं नाव ‘मेरगा’ ठिवलं गेल्या पाच वर्षांपास्नं कार्तिक वारीत नेतोय़ तिला बघायला शेतकºयांची गर्दी व्हतंय बघा! तसं ती हायच गुणी अन् देखणं बघणारे बरेच जण किंमत विचारतात, मग सांगून टाकलं ११ लाख रुपयं अनेकांनी त्यांच्या इच्छेनुसार मागणी केली, शेवटी एकानं ९ लाखाला मागितलं, पण नाही दिलं. कारण ती आमच्या घरची ‘लक्ष्मी’ हाय, आता तिला विकणार न्हाय, अशी भावना पशुपालक तात्यासाहेब कांबळे यांनी व्यक्त केली.

सहा वर्षांपूर्वी ते लहान रेडकू (मादी) ४ हजार ५०० रुपयाला इकत आणलं. तळाहातावरच्या फोडाप्रमाणं तिचा सांभाळ केला़ आम्ही तिला मेरगा नावानं हाक मारू लागलो़ ती खूप हुशार हाय. आम्ही बोललेलं तिला सगळं कळतंय़ रागावलो तर शांत उभी राहतेय़ मलाही तिचा लळा लागला़ ती पहिल्यांदा व्याली तेव्हा मादी रेडकू झालं ती १ लाख ११ हजार रुपयाला विकलं. 

दुसºयांदा व्याली ती मादीच झाली, तिचं नाव आम्ही ‘राधा’ ठेवलं. ती सध्या घरात हाय़ तिची उंची सध्या साडेचार फूट असून, लांबी सहा फूट आहे. ती केवळ दोन वर्षांची असून, अजून वाढ होऊन उंची सहा फुटापर्यंत होण्याची शक्यता हाय. तिसºयांदा व्याली तेव्हा नर रेडकू झालं. आता पुन्हा चौथ्या वेळंस गाबण हाय़ दुसºया वेळचं त्या मादी रेडकूला २ लाख १० हजार रुपयाला मागून गेलीत़ पण आम्ही तिलापण विकणार न्हाय़ 

मेरगा ज्या-ज्या वेळी व्याली, तिला बाळ झालं तेव्हा-तेव्हा पांडुरंगाला आणि परिसरातील भाविकांना पेढे वाटतोय़ मेरगाला बाळ झालं की आम्हालाही आनंद व्हतोय, म्हणून पेढे वाटून हा आनंद साजरा करतोय, असे तात्यासाहेब कांबळे सांगत व्हते़ मेरगा म्हशीचं जेवढं दूध असतं ते सर्व तिच्या बाळांनाच                 देत आलोय, घरी साधा चहालाबी तिचं दूध वापरत नाय़ माझे वडील नागनाथ कांबळे यांचा तिच्यावर लय जीव बघा! इकायचं नाव काढलं तर ते मी पण घरातून निघू जातो, असं म्हणतात

एकदा मेरगा आजारी पडली. तिनं अन्न, पाणी खाल्लं नाय म्हणून आमच्या कुटुंबातील सर्व जण उपाशी व्हतो़ माझं एकट्याचंच जीव हाय असं नव्हे तर अख्खं कुटुंब तिच्यावर जीव लावतंय़ तिची काळजी घेतंय़ म्हणून ती तगडी दिसतीया, असं तात्यासाहेब कांबळे सांगत व्हते़.

असा करतोय सांभाऴ़़
मेरगा, राधा आणि लहान दोन महिन्याचं रेडकू (नर) यांचा चांगल्या पद्धतीनं सांभाळ करतोय़ रोज त्यांच्यासाठी सुमारे ५०० रुपये खर्च करतोय़ रोज हिरवा चारा आवश्यकच़ त्यात मकवान, कडवळ याचा समावेश असतो़ शिवाय कळणा, भुस्सा असा खुराक देतोय़ त्यांची चांगल्या पद्धतीनं निगा राखतोय, म्हणूनच पंढरपूर तालुक्यासह सोलापूर, मिरज, कोल्हापूर, बेळगाव, इंदापूर या ठिकाणांहून लोक बघायला येतात़

या म्हशीचं वैशिष्ट्य़...
-‘मेरगा’ ही गवराळ जातीची पंढरपुरी म्हैस हाय़ नाकाडी पद्धत (अन्य म्हशीपेक्षा जास्त लांब नाक), तेलभुरी जातीची हाय़ क्वचितच या जातीची म्हैस बघायला मिळते़ शिवाय हिला चारा कमी लागतो़ तिची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. तिचं संगोपन सुक्या तसेच दुय्यम प्रतीच्या चाºयावरही शक्याय़ शिवाय दुधाची गुणवत्ताही चांगलीय़ व्याली की कमी कालावधीत पुन्हा गाभण जातीय. त्यामुळं वर्षाला चांगलं उत्पन्न मिळवून देतीया, हे या म्हशीचं वैशिष्ट्य हाय़

Web Title: It's our house's 'Lakshmi', watch now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.