जखमींना रूग्णालयात हलविण्याऐवजी प्रवाशांनी सेल्फी काढण्यात घालविला वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:01 AM2019-06-26T11:01:10+5:302019-06-26T11:04:09+5:30

टाकळी पुलावर झाला अपघात; दोन युवक गंभीर जखमी, अपघातग्रस्तांना उशिराने पोहोचविले रूग्णालयात

Instead of moving the injured to the hospital, the passengers spent their time in selfie removal | जखमींना रूग्णालयात हलविण्याऐवजी प्रवाशांनी सेल्फी काढण्यात घालविला वेळ

जखमींना रूग्णालयात हलविण्याऐवजी प्रवाशांनी सेल्फी काढण्यात घालविला वेळ

googlenewsNext
ठळक मुद्दे- अपघातात कर्नाटकातील दोन युवक गंभीर जखमी- जीपने दुचाकीस्वारांना पाठीमागून दिली धडक- पोलीस घटनास्थळी दाखल, मात्र वाहनधारक झाला पसार

सोलापूर : प्रवासी वाहतुक करणाºया जीपने पाठीमागून दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्यानंतर जखमींना तसेच सोडून चालकाने वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार आज टाकळी येथे घडला़ या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून जखमींना विजयपूर येथील रुग्णालयात उशिराने दाखल करण्यात आले.

सोलापूर विजयपूर महामार्गावर सोलापूरकडून इंडीकडे जाणाºया जीप या प्रवासी वाहतूक करणाºया वाहनाने टाकळी पुलावर दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली़ या धडकेने दोन दुचाकीस्वार पुलाच्या कठड्याला धडकून खाली पडले त्यात दोघे ही गंभीर जखमी झाले़ वाहन चालक त्यांना मदत करण्याचा बहाणा करीत खाली उतरला पुन्हा वाहन बाजूला घेण्याचे निमित्त करून तो वेगाने विजयपूरच्या दिशेने निघून गेला़ ही घटना पाहणाºया वाहनधारकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.

या अपघातातकर्नाटकातील दोन युवक गंभीर जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याऐवजी प्रवासी सेल्फी काढत होते़ यात बराच वेळ गेला आणि रक्तस्राव अधिक झाल्याने दोघेही बेशुद्ध झाले़ दोन्ही जखमींना कर्नाटकच्या प्रवासाने आपल्या वाहनातून उपचारासाठी रुग्णालयाकडे नेले़ कर्नाटक हद्दीत ही घटना घडल्याने त्याची नोंद झळकी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़ जखमींची नावे  समजू शकली नाहीत.



 

Web Title: Instead of moving the injured to the hospital, the passengers spent their time in selfie removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.