कचºयातूनही मिळू लागले कुर्डूवाडी नगरपरिषदेला उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:41 PM2019-01-01T14:41:52+5:302019-01-01T14:44:37+5:30

इरफान शेख  कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत गोळा केलेल्या कचºयातून नगरपालिकेने ३० ते ४० हजार रुपयांचा महसूल गोळा केला ...

The income generated by the Kurtuvadi Municipal Council | कचºयातूनही मिळू लागले कुर्डूवाडी नगरपरिषदेला उत्पन्न

कचºयातूनही मिळू लागले कुर्डूवाडी नगरपरिषदेला उत्पन्न

Next
ठळक मुद्देकुर्डूवाडी शहरातील सर्व कचराकुंड्या पालिकेने बंद केल्या ओल्या कचºयापासून तयार झालेल्या कंपोस्ट खताची तपासणी पुणे विभागाच्या कृषी खात्याकडून घंटागाडीतूनच कचरा गोळा करण्यात येत आहे

इरफान शेख 

कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत गोळा केलेल्या कचºयातून नगरपालिकेने ३० ते ४० हजार रुपयांचा महसूल गोळा केला आहे. यात निम्म्या ओल्या कचºयातून व निम्म्या सुक्या कचºयातून महसूल गोळा करण्यात आल्याने नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे. शहरातील कचराकुंड्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या असून, घंटागाडीतूनच कचरा गोळा करण्यात येत आहे.

कुर्डूवाडीची लोकसंख्या २२ हजार ४६३ असून, ४ हजार ६०० घरे आहेत. कचरा उचलण्यासाठी सहा घंटागाड्या, एक ट्रॅक्टर व एक डंपर आहे. कचºयाचे वर्गीकरण करण्यात येत असून, रोज सरासरी चार टन ओला व दोन टन सुका कचरा असतो. 

या कंपोस्ट डेपोत ओल्या कचºयासाठी प्रत्येकी ३० टनाचे ७ कंपोस्ट पीट तयार करण्यात आले आहेत. यातील एक खड्डा भरण्यासाठी १० दिवस लागत असून, ४५ दिवसात कंपोस्ट खत तयार होते. प्रत्येक खड्ड्यावर बॅक्टरिया तयार होऊन त्यात बायोकल्चर टाकण्यात येते. यामुळे खत कुजण्याची प्रक्रिया लवकर होऊन दुर्गंधी येत नाही व त्यावर माशाही बसत नाहीत. ओल्या कचºयासाठी शेतकºयांतून मोठ्या प्रमाणावर मागणी असून, सुका कचरा प्रत्येक महिन्याला विकला जात आहे.

ओल्या कचºयापासून तयार झालेल्या कंपोस्ट खताची तपासणी पुणे विभागाच्या कृषी खात्याकडून करण्यात आली व त्यांनी हे खत शेतीसाठी उपयुक्त असल्याचा अहवाल दिला आहे. या कंपोस्ट खत डेपोवर शेतकºयांनी भेट देऊन खताची मागणी केली आहे. प्रत्येक टनासाठी आम्ही २०० रुपये असा दर ठरवला आहे.
-कैलास गावडे, मुख्याधिकारी, कुर्डूवाडी

कुर्डूवाडी शहरातील सर्व कचराकुंड्या पालिकेने बंद केल्या आहेत. नागरिकांनी आपला कचरा विलगीकरण करुनच घंटागाडीला द्यावा. यापासून नगरपालिकेच्या वतीने त्या कचºयाचे कंपोस्ट खत बनविण्यात येईल व सुका कचरा अलग करणे सोयीस्कर होईल. खत विक्रीतून कुर्डूवाडी  नगरपालिकेचे उत्पन्न वाढेल.
-समीर मुलाणी, नगराध्यक्ष, कुर्डूवाडी

Web Title: The income generated by the Kurtuvadi Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.